Relationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!
लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.
Sex Tips For Women : जोडप्यांमध्ये येणारा क्षण सेक्स (Sex) हा आनंदाचा असतो. याद्वारे एका नात्याची एका वेगळ्या पद्धतीने सुरुवात होते. मुख्य म्हणजे लोकांना यामध्ये विविध प्रयोग (Various experiments sex) करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही. तुम्हाला माहितीये का, महिलांना सेक्सदरम्यान कोणत्या गोष्टी आवडत नाही.
असुरक्षेची भावना
महिला त्यांच्या शरीराबाबत खुप असुरक्षित असतात. लुक कसं असलं पाहिजे, कसं नको, या सर्व गोष्टींचा त्या ताण देखील घेतात. या गोष्टींकडे महिला सेक्सदरम्यान देखील तितकंच लक्ष देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पार्टनरच्या काल्पनिक अपेक्षा या गोष्टी आणखी बिघडवण्याचं काम करू शकतात.
दबाव अनुभवणं
नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, महिला सेक्स दरम्यान अपेक्षांचा दबाव अनुभवते. अनेक महिला या गोष्टींवर लक्ष देतात की, सेक्सदरम्यान त्या कशा दिसतायत, यावेळी त्यांच्या मनात आपला पार्टनर खूश होईल का असा प्रश्न येतो. अशावेळी पुरुष पार्टनरने महिलांनाचा सन्मान करणं गरजेचं असतं.
या गोष्टी महिलांना आवडत नाहीत
सेक्स दरम्यान जेव्हा व्यत्यय येतो त्यावेळी महिला काही प्रमाणात चिडचिड्या होतात. STI ची भीती यांसारख्या चिंतामुळे महिलांच्या मनातून सेक्सची भावना निघून जातो. याप्रमाणे जेव्हा पार्टनर स्वच्छतेवर लक्ष देत नाही ती, गोष्ट देखील महिलांना आवडत नाही. यामुळे महिलांना इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, मात्र अनेक पुरुष याकडे दुर्लक्ष करतात.
ओरल सेक्ससाठी महिला लगेच तयार होत नाहीत. अशावेळी जर पुरुषांनी त्यांच्यावर दबाव आणला तर महिलांना ही गोष्ट खटकू शकते. त्यामुळे पुरुषांनी याकडेही लक्ष द्यावे.
पॉर्न फिल्म पाहिल्यानंतर पुरुष फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे काही गोष्टी आपल्या पार्टनरसोबत करू इच्छितात. मात्र असं करणं महिलांना आवडेलच असं नाही. त्यामुळे महिलांना कंफरटेबल असेल अशा गोष्टींकडे लक्ष द्यावं.