मुंबई : आजच्या काळात बहुतेक स्त्रियांना सर्वात मोठी समस्या असते ती चेहऱ्याची. चेहऱ्यावर असलेले केस अनेकांच्या सुंदरतेची शान घालवतात. यावर तुम्ही घरगुती उपाय करुन ते नाहीसे करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक स्त्रीला सुंदर आणि स्वच्छ चेहरा असावा अशी इच्छा असते. ज्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. बरेच लोकं लेजर उपचार किंवा कमर्शियल हेअर रिमूव्हरचा वापर करतात. याचा चांगला फायदा देखील होतो. परंतु त्याचे साईट इफेक्ट देखील आहे. त्यामुळे नैसर्गिक उपाय करणे फायदेशीर ठरतात.


तुम्हाला नको असलेल्या केसांपासून जर कायमची सूटका हवी असेल तर तुम्ही एक घरगुती उपाय करु शकतात. ज्याचा तुम्हाला १० टक्के फायदा होईल. ज्याचे कोणताही साइड इफेक्ट्स नसतील. आपण केवळ 15 मिनिटात एक स्वच्छ आणि सुंदर चेहरा मिळवू शकतो.


या घरगुती उपायाचा सर्वाधिक वापर पूर्वेकडील स्त्रिया करतात. यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. जे तुमची त्वचा स्वच्छ, चमक आणि मऊ ठेवतात. जाणून घ्या याला तयार करण्याची आणि लागू करण्याची पद्धत.


साहित्य


2 टेबलस्पून मध
1 टेबलस्पून ओटमील पेस्ट
1 टेबलस्पून लेमन जूस


असा करा वापर


या सगळ्या गोष्टी एकत्र करुन घ्या. यानंतर हव्या त्या ठिकाणी तुम्ही ते लावा. १५ मिनिटांसाठी त्याला असंच असू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. स्वच्छ आणि मुलायम कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर मॉश्चराईजर लावा. महिन्यात कमीत कमी ४ ते ५ वेळा हा उपाय केल्यास तुम्हाला याचा लाभ होऊ शकतो.


लक्षात ठेवा


जर तुमची स्किन सेंसिटिव्ह आहे तर हा उपाय करण्याआधी स्पेशालिस्टचा सल्ला घ्या.