smoking can increase belly fat : आजकाल अधिकाधिक लोक पोटातील चरबीच्या समस्यांबद्दल चिंतित आहेत. बेली फॅट म्हणजे वाढलेली पोटाची चरबी, जी परिष्कृत साखर आणि संतृप्त चरबीमुळे होते असे लोक मानतात. पण मुळात आपल्या अनेक सवयींमुळे पोटाची चरबी वाढते. रोजच्या आहारात म्हणा किंवा वेसनसारख्या काही गोष्टींमुळे पोटाची ढेरी वाढू शकते. तुम्हाला जर बारीक दिसायचं असेल तर तुमच्यामधील काही सवयी सोडाव्यात लागतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढलेल्या पोटाचा बहुतेक लोकांना त्याचा त्रास होतो. मग मुले असो किंवा मुली असो, सुटलेली पोटाची ढेरी दिसायला खराब दिसते. पोटाची चरबी कमी करणे देखील तितके सोपे नाही. तुम्ही कितीही मेहनत केली तरी काही लोकांचा एक इंचही फरक दिसत होत नाही. अशा परिस्थितीत, सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की पोटाची चरबी सतत वाढत आहे. येथे जाणून घ्या काही गोष्टी ज्यामुळे तुमच्या शरीरातील पोटाची चरबी वाढते.


एका  अभ्यासानुसार धूम्रपान सुरू करणे आणि आयुष्यभर सिगारेट ओढणे या दोन्ही गोष्टी पोटातील चरबीच्या वाढीशी संबंधित आहेत. ह्यअॅडिक्शनह्ण या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासात असं म्हटलं की, धूम्रपानामुळे शरीरात व्हिसेरल फॅट वाढू शकते आणि हृदयरोग, मधुमेह, स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. 


अभ्यासकांनी म्हटले आहे की, व्हिसेरल फॅट दिसत नाही. मात्र, चरबी तुमच्या ओटीपोटात शरीरातील अवयवांना घेरते. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, तुमच्या शरीरातील एकूण चरबीपैकी 10 टक्के व्हिसरल फॅट बनवणे हे सामान्य आणि आरोग्यदायी आहे. तथापि, खूप जास्त व्हिसेरल चरबी जळजळ निर्माण करू शकते, ज्यामुळे जुनाट आजार डोके वर काढू शकतो किंवा होऊ शकतो. तसेच टीमने धूम्रपान सुरू केलेल्या 1.2 कोटी लोकांचा आणि 4,50,5000 हून अधिक आयुष्यभर धूम्रपान करणाऱ्यांचा शोध घेतला. त्यांनी 6,00,000 हून अधिक लोकांसह शरीरातील चरबी संदर्भात अभ्यास केला. त्यांच्या धूम्रपानाच्या सवयी आणि पोटावरील चरबी यांचा शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील चरबीच्या कप्प्यांशी कसा संबंध आहे, हे तपासले. \


पोटाची चरबी का वाढते?


पोटाची चरबी वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही दररोज वापरत असलेल्या अन्न आणि पेयांमधून मिळणाऱ्या कॅलरीज तुम्ही बर्न करत नाही. त्यामुळे वजन आणि पोटाची चरबी वाढू शकते. याशिवाय वाढत्या वयाबरोबर लोकांचे स्नायू कमी होऊ लागतात. आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसलेल्या लोकांसाठी ही समस्या अधिक गंभीर आहे.