Restless Legs Syndrome: तुम्हाला ही बसल्यानंतर पाय हलवण्याची सवय आहे का? तर याला हलक्यात घेऊ नका
तुम्ही बसून पाय हलवत राहतात. विनाकारण पाय हलवण्याच्या सवयीला रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम म्हणतात.
मुंबई : बर्याच वेळा जेव्हा तुम्ही खूप तणावात किंवा चिंतेमध्ये असता तेव्हा तुम्ही बसून पाय हलवत राहतात. विनाकारण पाय हलवण्याच्या सवयीला रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम म्हणतात. एका अभ्यासानुसार, पाय हलवताना अशा समस्या असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुप्पट असतो कारण रेस्टलेस लेग्ज सिंड्रोमचा थेट संबंध झोपेच्या कमतरतेशी असतो.
हृदयविकाराचा धोका वाढणार
पाय हलवण्याची थोडीशी सवय देखील हृदयविकाराचा धोका दुप्पट करते. तज्ज्ञांच्या मते, रेस्टलेस लेग्ज सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने झोपण्यापूर्वी 200 ते 300 वेळा पाय हलवले आहेत. त्यामुळे रक्तदाब आणि हृदय गती वाढते. यामुळे नंतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होऊ शकतात.
पाय हलवण्याची सवय लावू नका
पाय हलवल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. पाय हलवल्याने रक्तदाब वाढतो हे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे झोप येत नाही आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. तुम्हालाही पाय हलवण्याची सवय असेल तर हलक्यात घेऊ नका.
मनात नकारात्मक विचार येतात
बहुतेक लोक तणावाखाली असताना पाय हलवतात. काही लोक धुम्रपान आणि मद्यपान करतानाही पाय हलवतात. पाय हलवण्याची सवय देखील नकारात्मक विचारांशी जोडलेली दिसते, जेव्हा लोक पाय हलवतात तेव्हा बहुतेक लोकांच्या मनात नकारात्मक गोष्टी असतात.