What Is The Right Way To Cook Rice: भारतात वरण आणि भात हे Comfort Food म्हणून ओळखलं जातं. कारण कितीही प्रवास केला, कुठूनही आलो, बरं नसेल तरीही वरण भात हा भारतातील लोकांचा आवडीचा पदार्थ आहे. या सगळ्यात वरण-भात कसा तयार करावा याबाबतही संभ्रम आहे. अनेकदा तज्ज्ञ असं सांगतात की, वरण भातावर येणारा पांढरा फेस हा शरीरासाठी घातक असल्याचं म्हटलं जातं. 


भात खाणे किती घातक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तांदूळ, विशेषत: पांढरा तांदूळ, लठ्ठपणा, रक्तातील साखरेची समस्या आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी यासाठी अनेकदा घातक ठरतो. पांढऱ्या तांदळात साठलेल्या स्टार्चमुळे असे घडते. पांढरा तांदूळ वजन वाढण्यास कारणीभूत आहे कारण शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान धान्यातून फायबर काढून टाकले जाते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही योग्य प्रमाणात पांढरा भात खाल्ला तर ते तुमच्या दैनंदिन आहारासाठीही चांगले ठरू शकते. अशीच काहीशी अवस्था वरण म्हणजे डाळींची देखील आहे. 


कशामुळे होतो परिणाम?


डाळी किंवा भात शिजवताना येणाऱ्या पांढऱ्या फेस सॅपोनिन्सपासून बनलेला असतो. डाळीमध्ये सॅपोनिन्स नावाचे ग्लायकोसाइड असतात आणि जेव्हा ते पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा ते विरघळतात. 


शरीरासाठी का घातक? 


डाळ आणि तांदूळ यामध्ये सॅपोनिन्सचे गुणधर्म साबणासारखे असतात. या पदार्थात हवा अडकून फेस बनवतात. तर काही लोक असे म्हणतात की, डाळी उकळल्यावर त्यातील प्रथिने बाहेर पडतात. हवेतील कण जे गरम पाण्यापेक्षा जास्त विरघळलेले वायू धारण करतात ते पृष्ठभागावर फेस तयार करतात आणि त्याला प्रथिने विकृतीकरण म्हणजेच प्रोटीन डीनेचरेशन असे म्हणतात. डाळी येणारा हा फेस हानिकारक आहे. म्हणून असे पदार्थ खाऊ नये. तर खाण्यापूर्वी त्यावर येणार हा फेस काढून टाकण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. 


म्हणून कुकरमध्ये हे पदार्थ शिजवू नयेत 


 डाळी प्रेशर कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये किंवा पॅनमध्ये शिजवाव्या. जेणेकरून जेव्हा डाळी उकळताना वर येणार फेस आपल्याला सहज चमच्याने काढून टाकता येईल. चिकन उकळताना जो फेस दिसतो, त्याला स्कम म्हणतात. हा देखील शरीरासाठी घातक आहे आणि त्यात हाडांवर असलेल्या कोणत्याही अवशिष्ट मांसापासून येणारे गोठलेले प्रथिने असतात.