Right Way to Eat Garlic : (Indian food tradition) भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये काही पदार्थांना अनन्यसाधारण महत्त्वं असतं. अशा पदार्थांमध्ये आवर्जून वापरली जाणारी एक गोष्ट म्हणजे लसूण. असे क्वचितच पदार्थ असतील ज्यामध्ये लसूण वापरला जात नाही. चटणी, सांबार, माश्यांचा रस्सा, तांबडा- पांढरा, भाज्या,अगदी चिवड्यांमध्येसुद्धा लसूण वापरला जातो. या इवल्याश्या लसणाचे बरेच फायदे आहेत. पण, लसूण खाण्यापूर्वी तो योग्य पद्धतीनं शिजवला जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. (right way to eat Garlic Harmful Side Effects health news in marathi)


कच्चा लसूण कधी खाल्लाय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसणाला उग्र वास असल्यामुळे अनेकजण तो खाताना नाकं मुरडतात. पण, लसूण कच्चा खाण्याचे अनेक फायदे आहेत. तो शिजवल्यास त्यामध्ये असणारी अनेक पोषक तत्त्वं नष्ट होतात. त्यामुळं लसूण एकतर कच्चा खावा किंवा तो 60 अंशांहून जास्त तापमानावर शिजवू नये ही बाब कायम लक्षात ठेवा. 


लसणाची चव वाढवून तो कसा खावा? 


अती प्रमाणात तळू, शिजवून किंवा पेस्ट करून खाल्ल्यास लसणातून फक्त चव मिळते. पण, त्याचे महत्त्वाचे गुणधर्म मात्र नष्ट झालेले असतात. त्यामुळं शक्य असल्यास लसूण कच्चाच खावा. तसं शक्य नसल्यास काही पदार्थांमध्ये लसणाचा हटके वापर करूनही तुम्ही तो खाऊ शकता. विविध प्रकारचे डीप्स, ड्रेसिंग्स, सॉस आणि पेस्टोमध्ये तुम्ही तो वापरू शकता. 


गार्लिक ऑईल बनवा घरच्या घरी... 


एखाद्या कॉंटीनेंटल रेस्तराँमध्ये गेलं असता तिथे तुमच्यासमोर काही लहानशा बरण्या दिल्या जातात. ज्यामध्ये विविध प्रकारचे मसाले आणि तेलं असतात. त्यातलंच एक असतं. गार्लिक ऑईल, अर्थात लसणाचं तेल. हे तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता. कसं, ते पाहा... 


- एका भांड्यात चांगल्या प्रमाणात तेल गरम करा. (ऑलिव्ह ऑईल असल्यास उत्तम)
- आता मंद आचेवर तेल गरम होत असतानाच दुसरीकडे लसूणाच्या मोठमोठ्या पाकळ्या बारीक कापून घ्या. (दोन वाट्या लसणाच्या पाकळ्या)
- लसूण कापून झाल्यानंतर तो एका भांड्यात ठेवा. त्याच्या जोडीला भरडलेली सुकी लवंगी मिरचीपूड (एक चमका) टाका. बाजूला चवीनुसार मीठ टाका
- आता हे सर्व साहित्य असणाऱ्या भांड्यात कडकडीत गरम झालेलं तेल ओता आणि सर्व मिश्रण एकजीव करुन ठेवा. 
- हे तेल आता थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीत ठेवा. 
- विविध प्रकारचे पास्ता, नूडल्स, सँडविच किंवा मग अगदी वाफाळत्या भातासोबतही तुम्ही हे गार्लिक ऑईल खाऊ शकता. 


हेसुद्धा वाचा : Interesting Facts: वडा, भजी, भाजी, चिप्स... लज्जत वाढवणारा हा बटाटा आला तरी कुठून?


'या' व्यक्तींनी लसूण खाऊ नये
अॅसिडीटी किंवा आम्पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी शक्यतो लसूण खाऊ नये. अन्यथा त्यांना जळजळ, अस्वस्थता असे त्रास जाणवू शकतात. पचनशक्ती कमकुवत असणाऱ्यांनीसुद्धा लसूण खाऊ नये. लसूण पचण्यास जड आहे. त्यामुळे ज्यांना जड अन्न पचत नाही त्यांनी लसणाचं सेवनही टाळावं. श्वास किंवा शरीराला येणाऱ्या घामातून दुर्गंधी येत असल्यस लसूण खाणं प्रकर्षानं टाळा. अन्यथा समस्या वाढतील. 


लसणाचे फायदेही अनेक 
लसूण कोणी खाऊ नये ही बाब सहसा आपण दुर्लक्षितच ठेवतो. पण, आशा आहे की आता असं होणार नाही. बरं या लसणाचे फायदे माहितीयेत ना? शारीरीक सुदृढता असणाऱ्यांना लसणाच्या सेवनानं फायदाच होतो. या मंडळींची रोगप्रतिकारक शक्ती आणखी वाढते. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी लसूण खाल्ल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळं रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी राहतं. लसणामध्ये असणाऱ्या अँटीबायोटीक तत्त्वांमुळे तो अनेक समस्यांशी लढण्यासाठी मदत करतो.