Interesting Facts: वडा, भजी, भाजी, चिप्स... लज्जत वाढवणारा हा बटाटा आला तरी कुठून?

Potato Interesting Story: बटाट्याचे पदार्थ आपण सगळेच आवडीनं खातो. त्याचबरोबर आपल्याला कायमच बटाट्याचे तळलेले आणि उकडवलेले पदार्थही जास्त आवडतात. परंतु हा बटाटा कसा काय इतका लोकप्रिय होत गेला याची तुम्हाला कल्पना आहे का? 

Jan 03, 2023, 20:35 PM IST

Potato Interesting Story: गल्लीपासून दिल्लीपर्यंत बटाटा हा सगळीकडे लोकप्रिय आहे. मुंबईसारख्या शहरात तर बटाट्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बटाट्या चीप्स, बटाटे वडे, बटाट्याची भजी किंवा अगदी मुंबई चाटमध्येही आपल्याला बटाटा लागतोच. त्यामुळे बटाटा हा आपल्याला कायमच प्रिय राहिलेला आहे. पण हा बटाटा आला कुठून आणि तो इतका का लोकप्रिय होत गेला यामागची रंजक कथा तुम्हाला माहितीये का? 

1/6

बटाट्याची लोकप्रियता

what is the origin of patoto where this vegetable came from know the interesting facts

बटाट्याचे भारतीय आहारात अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झाले. याचे उत्पादन आता भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात होते आणि बटाट्याचे कोणतेही पदार्थ खाल्याशिवाय आपल्याला चैनच पडतं नाही. समोर आलेल्या एका अहवालानुसार मका, तांदूळ, गहूनंतर बटाटा हे जगातील चौथ्या क्रमांकाचे पीक आहे. 

2/6

सोळावे शतक आणि बटाटा

what is the origin of patoto where this vegetable came from know the interesting facts

बटाटा हा जगभर इतका लोकप्रिय झाला आहे की हा बटाटा नक्की कुठे कसा आला हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला उत्सुकता निर्माण झाली असेल. असं म्हणतात, सोळाव्या शतकात लोकांना बटाटा काय हेच माहिती नव्हते. नंतर जेव्हा कोलंबस हा जगभ्रमंतीसाठी आला तेव्हा त्यानं अनेक खंडात बटाटे नेले. 

3/6

आणि भारतात बटाटा आला

what is the origin of patoto where this vegetable came from know the interesting facts

भारतात बटाटा त्यावेळी इतका लोकप्रिय नव्हता परंतु इंग्रजांप्रमाणे व्यापार करायला आलेले पोर्तुगीज आणि डच या व्यापाऱ्यांनी भारतात बटाटा आणला. समुद्रामार्गे बटाट्याचा तेव्हा व्यापार होत असे. 

4/6

बटाट्याचा पोटॅटो झाला तेव्हा...

what is the origin of patoto where this vegetable came from know the interesting facts

असं म्हणतात की कॅरिबयन बेटांवरती बटाट्यांच्या लागवडीला सुरूवात झाली. युरोप खंडात आल्यानंतर बटाट्याचे नाव पटोटो झाले. आता तो पोटॅटो म्हणून प्रचलित आहे. आधी हा बटाटा कामटा म्हणूनही ओळखला जाई. त्याचबरोबर बटाटा हा आधी स्पेनमध्ये होता मग तो युरोपात गेला. मग तो पुर्वेकडे विकला जाऊ लागला आणि त्याचे उत्पादन होऊ लागले त्यानंतर तो पुर्व युरोपकडेही स्थिरावला. 

5/6

असा वाढत गेलं बटाट्याचे महत्त्व

what is the origin of patoto where this vegetable came from know the interesting facts

1623 मध्ये तो कॅनडामध्ये आल्याचे पुरावे आहेत असं म्हणतात.  1650 मध्ये तो बेल्जियम, नेदरलँड आणि लक्झेंबर्गमध्ये आला त्यानंतर 1740 मध्ये जर्मनी, प्रशिया आणि पोलंड आणि 1840 म्हणजे शंभर वर्षानंतर तो रशियात आला असा या बटाट्याचा तीनशे वर्षांचा इतिहास आहे. 1772 ते 1785 भारतात वॉरन हेस्टिंग्स हे गव्हर्नर होते त्यांनी बटाट्याला चालना दिली. 

6/6

ईस्ट इंडिया कंपनी आणि बटाटा

what is the origin of patoto where this vegetable came from know the interesting facts

बटाट्याचे महत्त्व आता वाढू लागले होते. 18 व्या शतकात भारतात पेशव्यांच्या अस्ताच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीनं बटाट्याच्या उत्पादनाला मोठी चालना दिली आणि आता 2023 मध्ये बटाटा आणि बटाट्या पदार्थांना रॉयल रूप प्रस्थापित झालं आहे.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)