मुंबई : आठवड्यातून तीन ते चार दिवस योग्य प्रमाणात दारु प्यायल्यास डायबिटीजचा धोका काही प्रमाणात कमी होतो. एका रिसर्चमधून ही बाब समोर आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण डन्मार्कमधील युनिर्व्हसिटीमध्ये यावर संशोध करण्यात आले. दारुच्या सेवनाने डायबिटीजवर होणाऱ्या परिणामांची तपासणी यावेळी करण्यात आली. 


यात थोड्या प्रमाणात दारुचे सेवन केल्यास डायबिटीजचा धोका कमी होत असल्याने संशोधकांना आढळले. दारुन पिणाऱ्यांच्या तुलने आठवड्यातून थोडीशी दारु घेणाऱ्या लोकांमध्ये डायबिटीजचा धोका ४४ टक्के कमी आढळला. तर महिलांमध्ये याचे प्रमाण ५८ टक्क्यांपर्यंत कमी आढळले. 


संशोधनानुसार, आठवड्यातून तीन ते चार दिवस थोड्या प्रमाणात दारुचे सेवन केल्यास पुरुषांमध्ये डायबिटीजचा धोका २७ टक्के तर महिलांमध्ये ३२ टक्के कमी होतो.