मुंबई : अनेकदा चांगले दिसण्याच्या नादात मुली चांगल्या फिटिंगचे ड्रेस निवडतात मात्र ब्रा निवडतात चूक करतात. चुकीच्या फिटिंगची ब्रा घातल्याने शरीराचा त्रास वाढू शकतो. यासाठी जेव्हा कधीही ब्रा खरेदी करण्यास जात असाल तर एकदा जरुर ट्राय करा आणि फिटिंग योग्य वाटली नाही तर लगेचच बदलून घ्या.चांगल्या फिटिंगची ब्रा घातल्यास साधा ड्रेसही ग्लॅमरस बनतो. मात्र ब्रा ही केवळ ड्रेसला ग्लॅमरस बनवण्यासाठी नाही. तर महिलांच्या अपर बॉडीला सपोर्टही देते. जर तुम्ही चुकीच्या फिटिंगची ब्रा घालताय तर त्यामुळे अनकंफर्टेबल वाटत राहते यासोबतच शरीरातील काही भाग दुखू लागतात. जर तुमची ब्रा सैल वा घट्ट असेल तरीही प्रॉब्लेम होतो. चुकीच्या फिटिंगची ब्रा घातल्याने ब्रेस्ट साईजही खराब होतात. इतकंच नव्हे तर पाठ, मान आणि खांदे दुखतात. यासाठी जेव्हा ब्रा खरेदी करण्यासाठी जात असाल तर ती ट्राय नक्की करुन बघा आणि योग्य फिटिंग वाटली नाही तर बदलून घ्या. जाणून घ्या चुकीच्या फिटिंगची ब्रा घातल्याने काय नुकसान होते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या महिला चुकीच्या फिटिंगची ब्रा घातता अशा महिलांना पाठ, मान तसेच मानदुखीचा त्रास सतावू शकतो. 


अनेकदा काही महिला घट्ट फिटिंगच्या ब्रा घालतात यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो तसेच रक्तप्रवाहात बाधा येते.


जर तुमच्या ब्राची साईझ लहान आहे तर स्ट्रिपचे निशाण त्वचेवर पडतात. यामुळे खांदे दुखीचाही त्रास होऊ शकतो.


सैल ब्रा वापरत असाल तर यामुळे ब्रेस्ट शेप बिघडू शकतो. अशा ब्रा ब्रेस्टला शेप देण्याऐवजी लूज करतात. 


ब्रेस्टच्या आकारावर योग्य त्या फिटिंगची ब्रा निवडणे आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे असते. जर तुम्हाला या बाबत अधिक माहिती नसेल तर अनेक ब्रँड्सच्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिलेली असते.