मुंबई: महाराष्ट्रभरात मान्सूनचं आगमन झालं आहे. पावसाचे दिवस सुरू झाले की हवेत आपोआपच गारवा वाढतो. पाऊस आणि वाफाळता चहा सोबतीला भजी हे गणित ठरलेलं आहे. मग वेटलॉसच्या मिशनवर असणार्‍यांनी भजी खावी का? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर हा प्रसिद्ध सेलिब्रिटी डाएटीशियन ऋजुता दिवेकरने शेअर केलेया या खास टीप्स तुम्ही नक्की जाणून घ्यायला हव्यात. 


पहा पावसाळ्यात कसा असावा डाएट ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



भजी आणि वाफळता चहा - 


चहासोबत भजी खाण्याचा उत्तम काळ म्हणजे पावसाळा. पावसाच्या दिवसात हमखास चहा सोबत तुमच्या आवडीच्या भजीचा आनंद घेणं फायदेशीर ठरतं. तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार भजी डीप फ्राय करण्यासाठी तेलाचा वापर करावा. पावसाळ्यात कांदा, बटाटाप्रमाणेच ओव्याची भजी आवडीने बनवली जाते.  


पालेभाज्या टाळा -  


पावसाळ्याच्या दिवसात चिखलाचं प्रमाण, मातीमध्ये मॉईश्चरायझर अधिक असल्याने भाज्या नाशवंत होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात पालेभाज्या खाणं टाळाव्यात.  


डाळींचा समावेश वाढवा - 


पावसाळ्याच्या दिवसात डाळी, कडधान्यांचा आहारातील समावेश वाढवावा. केवळ मूग,मटकी, राजमा इतपतं मर्यादीत न राहता आहारात 12 विविध डाळी आणि कडधान्यांचा समावेश करता येऊ शकतो.  


नाचणी, ज्वारी उत्तम  


पावासाळ्याच्या दिवसात नाचणी आणि ज्वारी या धान्यांचा आहारात समावेश वाढवावा. भाकरी, खिचडी अशा पदार्थांमध्ये नाचणी आणि ज्वारी एकत्र मिसळू शकता. अन्यथा नाचणीचं सत्त्व, डोसे, खीर, कूकीज, बिस्कीट अशा इंटरेस्टिंग मार्गांनीदेखील त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. 


मका -  


चहा आणि भजीप्रमाणेच पावसाळ्याच्या दिवसात भाजलेला मका खाण्याची गंमत काही औरच असते. मात्र पांढर्‍या दाण्याच्या मक्याचा आहारात अधिक समावेश करा. भाजलेला मका किंवा भाज्यांमध्ये किंवा वाफवून मक्याचा आहारात समावेश करणं अधिक फायदेशीर आहे.