उन्हाळ्याच्या दिवसात किंवा कोणत्याही समारंभात पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी वेलकम ड्रिंक दिलं जातं.या वेलकम ड्रिंकमध्ये बऱ्याचदा सब्जा टाकला जातो. तज्ञ्ज्ञांच्या मते रोज एक ग्लास पाण्यातून सब्जाचं सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करण्यास फायदेशीर 
आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे सूर्यास्ताआधी जेवण केल्याने शरीरासाठी फायदेशीर ठरतं.त्याचबरोबर जर तुम्ही रोज रात्री झोपताना एक ग्लास पाण्यातून  सब्जाचं सेवन केल्यास अवेळी किंवा रात्री अपरात्री भूक लागत नाही. त्यामुळे अपचनाशी संबंधित आजार होत नाही. सब्जामुळे पोट भरलेलं राहतं आणि फार काळ भूक लागत नाही. त्यामुळे जर वजन कमी करायचं असल्यास आहारात सब्जा समाविष्ट करू शकता. 



रक्तातील साखर नियंत्रणात राहते
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात आईस्क्रीम, कोल्ड्रींक आणि सरबताचं सेवन केलं जातं. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते. मात्र दिवसातून किमान एक ग्लास पाण्यातून किंवा सरबतातून सब्जाचं सेवन केल्यास रक्तात अतिरिक्त वाढणारी साखर नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सब्जाचं सेवन केल्याने शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 


हाडांचं आरोग्य सुधारतं 
शरीराला पुरेसं कॅल्शिअम मिळालं नाही की, हाडांची झीज व्हायला सुरुवात होते. फास्टफूडच्या जगात योग्य ते पोषक तत्वं न मिळाल्याने वयाच्या तीशीनंतर हाडं कमजाेर होण्याच्या त्रास जाणवतो. सब्जामध्ये ओमेगा -3 आणि फॅटी अ‍ॅसिड या घटकांचा समावेश असतो. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसची मात्रा असल्याने हाडांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. 


उष्णतेच्या त्रासावर गुणकारी 
वाढत्या गरमीमुळे अनेकांनी किडनीचे आजार होतात. लघवीला जळजळ होणं या सारख्या समस्येवर सब्जा फायदेशीर ठरतो.सब्जाचा गुणधर्म थंड असल्याने लघवीला होणारा दाह कमी होतो. सब्जाच्या सेवनाने किडनीच्या आजारावर रामबाण उपाय आहे. 


त्वचेसाठी गुणकारी 
सब्जामध्ये अँटी -मायक्रोबियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.सोरायसिस सारख्या त्वचाविकारांवर सब्जाचं सेवन फायदेशीर ठरतं. कोरड्या त्वचेसाठी सब्जा फायदेशीर आहे. एक ग्लास पाण्यातून सकाळी रिकाम्यापोटी सब्जाचं सेवन केल्यास त्वचेचा पोत सुधारतो त्याचप्रमाणे पुरळ येण्याच्या समस्येवर सब्जाचं सेवन करणं गुणकारी मानलं जातं.