वटवाघुळांना सुरक्षित मार्गाने घरातून बाहेर कसं काढाल?
केरळमध्ये निपाह व्हायरसने थैमान घातले आहे.
मुंबई : केरळमध्ये निपाह व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसने सुमारे 17 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे देशभरात या आजाराबद्दल भीती पसरली आहे. निपाह व्हायरस हा वटवाघुळांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतो. त्यामुळे वटवाघुळांबाबत एकूणच अनेक समज-गैर समज आहेत. केरळमधील निपाहच्या थैमानामागे बांग्लादेशी कनेक्शन
वटवाघुळ घरात येणं आणि समज गैरसमज
वटवाघुळांच्याबाबत आपल्या समाजात अनेक समज गैरसमज आहेत. घराजवळ वटवाघुळ फिरण हे अनेकजणांना अशुभ वाटते. काहींना हे संकटाचे संकेत वाटते. मात्र अनेकदा मानवी घरं ही सुरक्षित ठिकाणं वाटत असल्याने वटवाघुळं घरात शिरतात. वटवाघुळं त्यामध्येही मदर बॅट्स त्यांच्या पिल्लांसाठी काही सुरक्षित जागांचा विचार करतात. अनेकदा इतर प्राण्यांपासून वटवाघुळांना धोका असतो. Nipah Virus अलर्ट : शत्रू नव्हे, मित्र आहे वटवाघुळ ! अफलातून त्याचे फायदे
वटवाघुळांना कसं बाहेर काढाल ?
वटवाघुळांना बाहेर काढण्यासाठी त्यांना मारण्याची काहीच गरज नाही.
लाईट बंद करा -
वटवाघुळं अंधारात पळतात म्हणून अनेकजण घरामध्ये लाईट लावून ठेवतात. वटवाघुळांना लाईट अधिक आकर्षित करतात. परिणामी त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग शोधणं अधिक कठीण होऊ शकतो. म्हणून वटवाघुळ घरात शिरल्यास लाईट्स बंद करा. यामुळे त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग स्पष्ट दिसतो.
अल्ट्रा सोनिक आवाज -
तुमच्या घराजवळ वटवाघुळं असतील तर तुमच्याजवळ अल्ट्रा सोनिक आवाजकरणारे एखादे यंत्र ठेवू शकता. हे आवाज वटवाघुळांना धोक्याचे संकेत सूचित करतात. यामुळे वटवाघुळं पळून जाण्यास मदत होते. नक्की जाणून घ्या. Nipah Virus चा धोका ! सध्या केरळ ट्रीप करणं खरंच सुरक्षित आहे का?