एकच ब्रा दोन दिवस घालताय? अजिबात करू नका ही चूक, जाणून घ्या धक्कादायक Side Effects
Bra Hygiene : एकच ब्रा दोन दिवस घातल्यावर शरीरावर साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात. ब्रा कायम नियमित स्वरुपात साफ करणे अत्यंत गरजेचे आहे. एकच ब्रा दोन ते तीन दिवस घातल्यावर इन्फेक्शन होण्याची किंवा छातीला दुखापत होण्याची दाट शक्यता असते.
महिलांसाठी ब्रा घालणे एखाद्या कामापेक्षा कमी नाही. हे दिनक्रमातील कामांपैकी एक गोष्ट आहे. दिवसभर घट्ट ब्रा घालणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. ब्रा वेगवेगळ्या आकारात आणि साईजमध्ये येतात. परंतु प्रत्येक वेळी ते परिधान करणे बंधनासारखे वाटते. ब्रा घालणे ही महिलांसाठी गरज आहे, आरामदायी नाही. हे केवळ सामाजिक जबाबदारीसाठीच नाही तर महिलांच्या शरीरासाठीही आवश्यक आहे.
ब्रा घालण्याची सुरुवात ग्रीसमध्ये झाली. काही वर्षांपूर्वी, महिलांनी प्रथम ग्रीसमध्ये ब्रा घालण्यास सुरुवात केली, परंतु आज तिचा आकार सुरुवातीपासून पूर्णपणे वेगळा आहे. पूर्वीच्या ब्रा लोकरीच्या किंवा तागाच्या पट्ट्यांपासून बनवल्या जात होत्या. हे महिलांच्या स्तनांभोवती गुंडाळलेले होते. त्यात काळानुरूप बदल होत गेले. ब्रा घालण्याचे स्वतःचे फायदे आणि साइड इफेक्ट्स आहेत, परंतु काही लोक असे आहेत जे दोन-तीन दिवस एकच ब्रा घालतात.
एकच ब्रा सारखी घातल्यावर काय होतं?
दोन-तीन दिवस एकच ब्रा का घालू नये?
मुली ब्रा च्या अनेक जोड सोबत ठेवतात, पण अनेकदा असे दिसून येते की आळशीपणामुळे किंवा काही वेगळ्या कारणामुळे अनेक दिवस तीच ब्रा घालतात. प्रसूती-स्त्रीरोग तज्ज्ञ (OBGYN), डॉ. तनुश्री पांडे पाडगावकर यांच्या मते, दोन-तीन दिवस एकच ब्रा घातल्याने तुमच्या शरीराला हानी होते. विशेषत: उन्हाळ्यात हा त्रास वाढतो. घट्ट ब्रा घातल्याने घाम साचतो. तीच ब्रा सतत घातल्याने फंगल इन्फेक्शन, शरीरात पुरळ उठणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
ब्रा धोण्याची योग्य पद्धत
डॉ.तनुश्री पांडे पाडगावकर यांच्या मते, प्रत्येक वेळी ब्रा काढल्यानंतर ती स्वच्छ करणे गरजेचे आहे. ब्रा हाताने स्वच्छ करावी. तसेच ब्रा पाणी आणि साबणाच्या मदतीने स्वच्छ केले पाहिजे. ब्रामध्ये सर्फ किंवा साबण राहणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. ते खुल्या आणि हवेशीर ठिकाणी व्यवस्थित वाळवले पाहिजे. अनेकदा असे दिसून येते की स्त्रिया कपड्यांखाली ब्रा किंवा पँटी सारखे कपडे सुकत घालतात. ही चुकीची पद्धत आहे. ब्रा नीट न वाळवल्यास नुकसान होऊ शकते.
खूप वेळ ब्रा घालण्याचे दुष्परिणाम
जास्त वेळ ब्रा घातल्याने पाठदुखी आणि खांदेदुखीचा त्रासही होऊ शकतो. याशिवाय दिवसभर ब्रा घातल्याने त्वचेवर डाग पडतात. दिवसभर ब्रा घातल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. स्तन दुखणे, दुखणे यासारख्या समस्या उद्भवतात. दिवसभर ब्रा घातल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होतो. पाठ आणि मान दुखणे, त्वचेची जळजळ, हायपरपिग्मेंटेशन आणि बुरशीचा प्रसार होण्याचा धोका वाढतो.