मुंबई : संपूर्ण देशभरात सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या धोकादायक व्हायरसमुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. चीनमध्ये तर प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात कोरोनाविषयी भीती निर्माण झाली आहे. हा व्हायरस नक्की कशामुळे प्रसारित होत आहे याचा शोध अखेर वैज्ञानिकांनी लावला आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार आता आपण या धोकादायक व्हायरसवर मात करू शकतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार फक्त थंडीच्या ठिकाणी हा विषाणू पसरतो. ३० डिग्रीपेक्षा जास्त तापमानाच्या ठिकाणी हा व्हायरस जास्त काळ टीकू शकत नाही. त्यामुळे आता तुमचा जर कुठे थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा बेत असेल तर सध्या टाळा. 


गेल्या महिन्याभरापासून चीनमधील वुहान शहरातील हवामान ६-८ डिग्री सेल्सियस आहे. त्यामुळे वुहानमध्ये कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. फक्त १५ सेकंदाच्या आत या विषाणूचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 


थंड हवेच्या ठिकाणी हा विषाणू लवकर पसरत असल्याचा दावा जर्मनीच्या वैज्ञानिकांनी केला आहे. ४ डिग्री किंवा त्यापेक्षाही कमी तापमानात हा विषाणू एका महिन्यापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो. कोरोनाने आतापर्यंत १,६३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर एकूण ६६ हजार लोकांना याची लागण झाली आहे.