मुंबई : मुलींना समजून घेणं ही महाकठीण गोष्ट असल्याचं अनेक मुलांचं मत आहे. पण मुलींना समजून घेणं ही काही इतकी कठीण गोष्ट नाही. मुली त्यांच्या मनात अनेक गोष्टी साठवून ठेवतात. प्रामुख्याने या '5'  गोष्टींचा सुगावा त्या कधीच तुम्हांला लागू देत नाहीत. म्हणूनच तुम्ही या गोष्टींबद्दल सजग राहणं आवश्यक आहे.  


 समजून घेणारी मुलं - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुली या भावनिक असतात. खूपवेळाने का होईना मुली त्यांच्या मनातील भावना मोकळ्या करतात. मुली कणखर असल्या तरीही त्या भावनिक असतात. त्यामुळे मैत्री करतानादेखील जो मुलगा त्यांच्या समस्या समजू शकेल अशाच व्यक्तीची त्या घट्ट मित्र म्हणून निवड करतात.  


 पूर्वायुष्य - 


मुली रिलेशिपमध्ये कितीही खूष असल्या तरीही त्या बॉयफ्रेंडसोबत त्यांच्या पास्ट लाईफ, पूर्वायुष्याबद्दल बोलणं शक्यतो टाळतात. अनेकदा मुलींना भीती वाटते की पूर्वायुष्याबद्दल बोलण्यामुळे त्यांच्या सध्यातील नात्यावरही परिणाम होऊ शकतो. 


सेव्हिंग (आर्थिक बचत) - 


मुली त्या करत असलेल्या सेव्हिंगबाबत कधीच खुल्याने बोलत नाहीत. त्याबददल अनेकदा त्या काही गोष्टी लपवून ठेवतात. त्या अशा गोष्टी अनेकदा लपवून ठेवतात. भविष्यात अशा पैशांचा योग्यरित्या वापर करता यावा याकरिता मुली सेव्हिंगबाबत बोलणं टाळतात.  


ट्रीटमेंट - 


मुली त्यांच्या वैद्यकीय चाचण्या, मेडिकल ट्रीटमेंटबाबतही बोलणं टाळातात. अनेकदा मुली एकाच वेळेस अनेक शारिरीक, मानसिक आणि वैचारिक पातळींवर झगडा करत असतात. कोणत्याही ट्रीटमेंटबाबत खुलेपणाने बोलणं त्यांच्या  नात्यावर गंभीर परिणाम करू शकतात या भीतीनेच त्या बोलणं टाळतात.