Fitness Tips : लोक म्हणतात की वय ही देवाची देणगी आहे परंतु हे संपूर्ण सत्य नाही. दीर्घायुष्य असलेल्या लोकांची जीवनशैली थोडी वेगळी असते असं म्हणातात. जर आपणही अशी जीवनशैली अंगीकारली तर आपण निरोगी राहू आणि दीर्घायुष्य जगू शकतो. त्यासाठी आपल्याला या काही सवयींचा अवलंब करावा लागेल. 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    योग्य आहार 


पूर्वी लोकांचे वय 80-100 च्या दरम्यान पाहायला मिळायचे पण आता सरासरी वय 50-60 वर्षे झाले आहे याचे मुख्य कारण म्हणजे आपले खाणेपिणे. आपले आरोग्य बनवण्यात आपला आहार महत्वाची भूमिका बजावते. आपण काय खातो यावर आपले आरोग्य अवलंबून असते. बदलत्या काळानुसार आपण घरगुती खाणे कमी केले आहे आणि फास्ट फूड आणि पॅकेज असलेले पदार्थ जास्त खाऊ लागलो आहोत. जर तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य हवं असेल तर असा आहार घ्या जो तुमच्या आरोग्यासाठी योग्य असेल. 


  • रोज योगा करा


भारतातील योगाची परंपरा जुनी आहे त्यामुळेच पूर्वीचे लोक योग केल्यामुळे नेहमीच निरोगी आणि दीर्घायुषी होते. योग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. जर तुम्हीही तुमच्या जीवनशैलीत योगाचा समावेश केला तर तुम्ही आजारांपासून दूर राहाल.


  • नित्यक्रमात बदल करा 


रुटीनवर वयावरही परिणाम होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण वेळेची काळजी घ्यायला विसरलो आहोत. उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो. जेवणाची कोणतीही निश्चित वेळ नसते. कधी पहाटे 4 वाजता तर कधी रात्री 12 वाजता आपण जेवण ऑर्डर करतो याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आजार होऊ लागतात.


  • आनंदी असणे आवश्यक आहे


आनंदी राहणे हे देखील दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. माणूस आनंदी असेल तर आजारही दूर राहतात आणि आपण जास्त जगतो. आनंदी राहिल्याने नैराश्य आणि चिंता यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत आणि हृदयही निरोगी राहते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.)