Vaccine in Cancer : गर्भाशयाचा कर्करोग ही प्रचंड गंभीर समस्या आहे. मात्र आता गर्भाशयाच्या कर्करोगावर रामबाण इलाज सापडण्याची शक्यता आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनं (Serum Institute of India) सर्व्हायकल कॅन्सरवर ( cervical cancer) शोधली असून याच्या वापराला परवानगीसाठी डीजीसीआयकडे (Drugs Controller General of India) अर्ज केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीरम इन्स्टिट्यूटनं क्वाड्रीव्हेलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (quadrivalent human papillomavirus) ही लस विकसित केली आहे. 8 जून रोजी कंपनीनं DCGIकडे अर्ज केलाय.  फेज 2 आणि फेज 3च्या क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्या असून लसीचे डोस आणि सर्व वयोगटातील व्हॅक्सिन अँटीबॉडी प्रतिक्रियांची माहिती अर्जासोबत जोडण्यात आलीय आहे.


बुधवारी तज्ज्ञांच्या समितीचा बैठक झाली असून लस बाजारात आणण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. 


गर्भाशायचा कर्करोग ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. देशातील महिलांमध्ये आढळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर असून याचा मृत्यूदरही अधिक आहे. 15 ते 44 वयोगटातील महिलांना या कॅन्सरचा जास्त धोका असतो. सीरमची ही लस याच वर्षाच्या अखेरीस बाजारात येण्याची शक्यता असून तिची किंमतही सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असेल. गर्भाशयाच्या कर्करोगावर ही स्वदेशी लस रामबाण उपाय ठरण्याची शक्यता आहे.