मुंबई : 'द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन' मधील नवीन अभ्यासात कमी उंचीच्या पुरुषांशी संबंधित अनेक मनोरंजक माहिती समोर आली आहे. या अभ्यासात असं आढळून आलंय की, कमी उंची असलेले पुरुष अधिक सेक्‍शुअली एक्टिव असतात. न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी 531 पुरुषांवर केलेला हा अभ्यास केला आहे.


अभ्यासात काय म्हटलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभ्यासात असं आढळून आलं की, ज्या पुरुषांची उंची 175 सेमीपेक्षा कमी होती, म्हणजेच ज्यांची उंची 5'9 पेक्षा कमी होती, त्यांची सेक्स ड्राइव्ह चांगली होती. कमी उंचीचे पुरुष केवळ सेक्‍शुअली एक्टिव नसतात, परंतु त्यांच्या जोडीदाराशी घटस्फोट घेण्याची शक्यता 32 टक्के कमी असते. 


संशोधकांचं म्हणणं आहे की, कमी उंची असलेले पुरुष जास्त घरगुती कामं करतात आणि उंच पुरुषांपेक्षा जास्त पैसे कमावतात. एकूणच, या अभ्यासानुसार, पुरुषाची उंची जितकी कमी असेल तितका तो चांगला जोडीदार असल्याचं सिद्ध होतं.


संशोधकांना असं वाटतं की, उंच पुरुष त्यांच्या दिसण्याबद्दल अधिक विश्वास ठेवतात आणि घरातील कामांना ते योग्य मानत नाहीत. दुसरीकडे, कमी उंची असलेले पुरुष स्वतःला सिद्ध करण्यात गुंतलेले असतात आणि यामुळेच ते घरी आणि ऑफिसमध्ये कठोर परिश्रम करतात. 


असं नाही की स्त्रियांना लहान पुरुष आवडत नाहीत. अशी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपी आहेत जिथे पुरुष लहान आणि स्त्रिया उंच असतात.