मुंबई : पुरुषांच्या डोक्यात सतत सेक्सचा विचार सुरू असतो. असं म्हटलं जातं की, प्रत्येक सात सेकंदांनी पुरुषांच्या मनात सेक्सचा विचार येतो. अनेक जणांचा यावर विश्वास बसतो. पण असं होणं खरंच शक्य आहे असा विचार तुम्ही केलाय का? सेक्सचा खरंच प्रत्येक सात सेकंदांनंतर विचार करणं शक्य आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकडेवारी केली तर प्रत्येक सात सेकंदांनंतर सेक्सचा विचार केला तर प्रत्येक तासाला हा विचार 514 वेळा येईल. तसंच दिवसभरात आपण नीट जागे असतो असं मानून 14 तास गृहित धरलं तर दिवसाला 7,200 वेळा सेक्सचा विचार मनात येतो असं, म्हणणं वावगं ठरणार नाही.


कदाचित तुम्हालाही ही संख्या जास्त वाटली असेल. दुसऱ्या कोणत्याही विचारापेक्षा या विचारांची कथित संख्या बऱ्याच पटीने जास्त आहे. मग आपल्या मनात सेक्स आणि इतर विचार दिवसभरात कितीवेळा येतात हे कसं पाहायचं? 


विचार मोजण्याची पद्धत


मनात सेक्स विचार मोजण्यासाठी मानसशास्त्रज्ञ एक शास्त्रीय पद्धती वापरतात. या पद्धतीला 'एक्सपिरिअरन्स सॅंपलिंग' असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये एखादा विचार आला की तो त्याच क्षणी मोजायला सांगितलं जातं. ही संख्या मोजण्यासाठी टेरी फिशर आणि त्यांच्या ओहायो विद्यापीठातील संशोधन टीमने क्लिकर्सचा वापर केला. यामध्ये कॉलेजला जाणाऱ्या 283 विद्यार्थ्यांची तीन गटात विभागणी करण्यात आली. 


यामध्ये जेव्हाही सेक्स, खाणं किंवा झोपण्याचे विचार येतील तेव्हा क्लिक करून त्यांना नोंद करायला त्यांना सांगितलं. यानुसार एका पुरुषाच्या मनात दिवसभरात 19 वेळा सेक्सचे विचार येत असल्याचं समोर आलं. हे प्रमाण महिलांपेक्षा जास्त होतं. महिलांच्या मनात एका दिवसात सरासरी 10 वेळा हे विचार येत असल्याची नोंद आहे.


याशिवाय पुरुषांच्या पुरुषांच्या मनात खाण्या-पिण्याचे आणि झोपेचेही विचार जास्त येत असल्याची माहिती या अभ्यासातून मिळाली. 


महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचारांमध्ये प्रत्येक व्यक्तीनुसार फरक दिसून आला. काही लोकांनी दिवसभरात फक्त एकदाच सेक्सचा विचार आल्याचं नमूद केलं. तर एका व्यक्तीने 388 वेळा क्लिक केलं होतं. यानुसार गणना केली तर त्याच्या मनात साधारणपणे दर दोन मिनिटांनी सेक्सचा विचार येत होते, असं म्हणायला पाहिजे.


(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य विद्यापीठातील अभ्यासावर आधारित आहे.  ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)