Navratri Fasting Tips in Marathi: येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) सुरुवात होणार आहे. संपूर्ण भारतात 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र महोत्सव साजरी केला जाईल. नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गादेवीचे (Goddess Lakshmi Puja) भक्त नऊ दिवस उपवास करतात. मनोभावे देवीची आराधना करतात. तसेच, भक्त दुर्गा देवीच्या मंदिरांनाही भेट देतात. सलग नऊ दिवस उपवास असल्याने तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी (Health Care)  घेणं गरजेचं आहे. उपवासाच्या दिवसात योग्य आहार गरजेचा असतो. त्यामुळे तुम्हीही फिट आणि निरोगी पाहण्यासाठी खाली दिलेल्या पाच टिप्स (Fasting Tips) फॉलो करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसिक आरोग्य जपा


तुम्ही नऊ दिवस उपवास करत असाल तर तुमची मानसिक तयारी असणे खूप गरजेचे आहे. वरात्रीच्या काळात मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान करू शकता. उपवास दरम्यान जास्त कसरत करणे टाळा आणि तुम्ही केवळ ध्यान आणि प्राणायाम सारख्या क्रियाकलाप करू शकता.


संतुलित आहार


उपवासाच्या दिवसात फक्त एक जेवण घेतल्याने तुमचे आरोग्य बिघडतं. तुम्ही सकाळी फळं, ज्यूस, स्नॅक्स घेऊ शकता आणि संध्याकाळी उपवासाचं सात्विक अन्न खाऊ शकता.


तळलेले पदार्थ नको रे बाबा


साबुदाण्याचे वडे, गव्हाच्या पिठाच्या पुर्‍या, पराठे किंवा पाण्याची तांबूस पिठाची भजी असे पदार्थ खाण्यात अनेकांचा भर असतो. परंतू शक्य असेल तर तळलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे तुमच्या रक्तातील सारखेची पातळी वाढू शकते.


शुगर असेल तर उपवास टाळा


जर तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच उपवास करा. मधुमेही लोक दीर्घकाळ उपाशी राहिल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.


मीठ आणि साखर


उपवासाच्या काळात कॅलरीज कमीह होण्याची शक्यता असते. मात्र, उपवासात मीठ आणि साखरेचं प्रमाण संतुलित असलं पाहिजे. त्याचबरोबर पाणी देखील भरपूर प्या.


आणखी वाचा  - Weight Loss : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय योग्य? पाहा कोणामध्ये किती आहेत कॅलरीज?


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)