मुंबई : मुलं वयात आल्यानंतर त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होण्यास सुरूवात होते. त्यामुळे मुलांमध्येही चेहर्‍यांवर पिंपल्स वाढण्यास सुरूवात होते. शरीरात होणार्‍या हार्मोनल बदलांसोबतच संवेदनशील त्वचा असणार्‍यांमध्ये वातावरणातील प्रदूषण, धूर, धूळ यामुळे त्वचा खराब होऊ शकते. परिणामी पिंपल्सचा त्रास वाढतो. 


शेव्हिंग करताना लक्षात ठेवा खास टीप - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेहर्‍यावर पिंपल्सचा त्रास असणार्‍यांमध्ये शेव्हिंग करतानाही वेदना होऊ शकतात. त्यामुळे अशा पुरूषांनी शेव्हिंग करताना काही खास टीप्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे. 


केमिकलयुक्त शेव्हिंग क्रीम आणि सोबतीला धारदार रेझरमुळे त्वचेची नुकसान होते. अशावेळेस वेदना टाळण्यासाठी एक खास टीप नक्की लक्षात ठेवा. 


पिंपल्सचा त्रास असणार्‍या पुरूषांनी शेव्हिंगपूर्वी एक गरम टॉवेल काही वेळ चेहर्‍यावर ठेवावा. 


किमान 2 मिनिटं चेहर्‍यावर गरम टॉवेल ठेवल्याने चेहरा मुलायम होण्यास मदत होते. सोबतच चेहर्‍यावरील केसांची बारीक बारीक छिद्रदेखील मोकळी होण्यास मदत होते. अशा त्वचेवर शेव्हिंग करताना त्रास कमी होतो.