Mental Fitness : मेंटल फिटनेससाठी Shefali Shah ने दिला जबरदस्त सल्ला, म्हणाली...
डार्लिंग (Darling) चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत शेफाली शहाला एक प्रश्न विचारण्यात आला. शेफाली तू आयुष्यातील वेदनांसोबत कसं डिल कसे करते?
Shefali Shah : शेफाली शहा ने तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना आणि बॉलीवूडला भूरळ पाडली आहे. शेफाली शहा ही चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक, अशी तिची ओळख. दिल्ली क्राइम (Delhi Crime), द जंगल बूक (The Jungle Book), डार्लिंग (Darling), ह्युमन (Human), डॉक्टर जी (Doctor G), जलसा (Jalsa), दिल धडकने दो (Dil Dhadakne Do) या सीरीज च्या माध्यमातून आपण सर्वांनी तिचं काम पाहिलं आहे.
आणखी वाचा - Urfi Javed : चेहऱ्यावर ग्लो पाहिजे का.. उर्फीने असं काही सांगितलं की तुम्ही ऐकून व्हाल थक्क...
डार्लिंग (Darling) चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत शेफाली शहाला एक प्रश्न विचारण्यात आला. शेफाली तू आयुष्यातील वेदनांसोबत कसं डिल कसे करते? असं विचारण्यात आलं. तेंव्हा शेफालीने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हालाही पॉझिटिव्ह वाटेल. (Shefali Shah gives great advice for mental fitness nz)
शेफालीचं उत्तर :
'तुम्हाला वेदना होत असतील तर त्या वेदना मान्य करा. तुम्हाला काहीच होत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करु नका. तुम्हाला तुमच्या वेदना होत आहेत हे दाखवण्याचा अधिकार आहे. तुम्हाला तक्रार करण्याचाही अधिकार आहे. पण वेदना होत असतानाही तुम्ही त्या लपवल्या तर कदाचित त्या सगळ्या गोष्टींचा राग किंवा तुमची चिडचिड दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या भावना जोपर्यंत समोरच्याला सांगणार नाहीत तोपर्यंत समोरच्याला काहीच कळणार नाही. जगाला तुम्ही किती खुश आहात हे खोटं दाखवण्याऐवजी त्या एक्सप्रेस करा." याबाबत बोलताना ती असंही म्हणाली की ती याबाबत बोलायला काही तज्ज्ञ नाही. मात्र तिने आला आलेल्या अनुभवावरून हे खास शेअर केलं आहे.
अनेकदा आपल्यासोबत काही प्रसंग घडतात, जेंव्हा एखाद्या व्यक्तीचा आपण राग मनात ठेवतो. योग्य वेळेस आपली भावना व्यक्त करत नाही, एक्सप्रेस होत नाही. अशाने गैरसमज वाढतात, तुम्हाला त्रास होत असेल तर त्याबाबद्दल व्यक्त होणं गरजेचं आहे.
आणखी वाचा - Weight Loss Tips : या 6 नियमांमुळे तुमचे वजन सहजपणे कमी होईल...जाणून घ्या