निरोगी आयुष्यासाठी सकाळी लवकर उठणे महत्वाचे : चांगल्या झोपेकरता काही खास टीप्स
उशिरापर्यंत जागल्यामुळे शरीराला त्रास होतो.
मुंबई : उशिरापर्यंत जागल्यामुळे शरीराला त्रास होतो. एका संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की, जी व्यक्ती रात्री उशिरापर्यंत जागते त्या व्यक्तीला सकाळी उठण्यासही उशिर होतो. आणि याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. संशोधनात मिळालेल्या माहितीनुसार, उशिरा उठवणाऱ्या व्यक्तींची आयुमर्यादा ही लवकर उठणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी असते. तसेच त्यांच्या मरण्याची शक्यता 10 टक्यांहून अधिक असते.
उत्तम आरोग्यासाठी हे महत्वाचे
शिकागोच्या नार्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीने चार लाखहून अधिक लोकांवर संशोधन करून ही बाब समोर आली आहे. 'द गार्जियन'ने दिलेल्या माहितीनुसार स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी कमीत कमी सात ते नऊ तास उत्तम झोप घ्यावी.
रात्री जागल्यामुळे वाढतात ह्या समस्या
संशोधनात क्रिस्टन नटसनने म्हटल्याप्रमाणे, रात्री जागणाऱ्यांमध्ये शारीरिक समस्या अधिक असते. याकरता 38 ते 73 वर्षांच्या व्यक्तींवर संशोधन करण्यात आला आहे. यामधील 27 टक्के लोकं ही सकाळी लवकर उठतात. आणि 9 टक्के रात्री उशिरापर्यंत जागतात. नटसनने सांगितलं की, पूर्ण अभ्यासातून असे निष्पन्न झाले आहे, 58 लाख लोकांच्या शरीराचे स्वास्थ हे बिघडलेले असते. त्यांना डायबिटीज, हृदयाचे आजार, मानसिक ताण, श्वसनाचा त्रास यासारख्या समस्या उद्भवतात.
लवकर झोप येण्यासाठी काय कराल?
1. डोळ्यांना दमवण्यासाठी वाचन करा
लहानपणी अभ्यास करताना बंद होणाऱ्या डोळ्यांना उघडे ठेवणे फार अवघड जायचे. आठवतय? त्यातूनच आयडिया घेऊन डॉ. विन्टर यांनी असे सुचवले की झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक, मॅगॅझिन वाचायला घ्या, पण हो… झोप उडवणारे काही वाचू नका.
2. चांगल्या गोष्टींचा विचार करा
आपले विचार विचलीत करणारी इलेक्ट्रॉनिक् साधने, उदा. मोबाइल, टॅबलेटस शक्यतो दूर ठेवा. रात्रीच्या वेळी मोबाइल स्क्रीनचा उजेड झोप न लागण्याचे कारण असू शकते.
3. नुसतं पडून राहा
झोप लागत नाही म्हणून बसून वा उभे राहून काही काम करत राहू नका. बुध्दीला तुमच्या उभे राहण्याने झोपायचे नाही असा सिग्नल जातो.
4. रात्री सगळ्या लाईट लावू नका
झोपेतून जागे झाल्यावर जर बाथरूमला जावे वाटले तर वाटेतील सर्व लाईट लावत जावू नका. मानवी मेंदू कोणत्याही प्रकाशाला जागे राहण्याचा एक सिग्नल आहे.