मुंबई : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहे. या सिझनमध्ये आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. आंबे खाण्यासाठी अनेकजण या सिझनची आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा हे फळ सर्वांनाच आवडतं. याव्यतिरिक्त, हे आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी मानलं जातं. यामध्ये असलेले बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंब्याचे नियमित सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते असं मानलं जातं. पण काहींचा असा समज आहे की आंबा खाल्ल्याने वजन वाढत तर काहींच्या सांगण्यानुसार, आंबा खाल्ल्याने वजनामध्ये घट होते. चला तर मग जाणून घेऊया की आंबा खाल्ल्याने खरंच वजनात घट होते का?


आंबा खाल्ल्याने वजन कमी होतं?


आंबा वजन कमी करतो की नाही यावर तज्ज्ञांची विविध मतं आहेत. काहींच्या म्हणण्याप्रमाणे, आंब्यामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, जे वजन कमी करण्यास फायदेशीर, परंतु काहीजण याबाबत सहमत नाहीत. आंबा इतर ऋतूंमध्ये मिळत नसल्याने लोक उन्हाळ्यातचं मोठ्या प्रमाणात सेवन करू लागतात. हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.


दरम्यान एका अभ्यासानुसार, 27 सहभागींनी 12 आठवडे 100 kcal असलेले आंबे खाल्ले. याने रक्तातील ग्लुकोज, सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन आणि एकूण अँटिऑक्सिडंटमध्ये वाढ झालेली दिसून आली. शिवाय आंबा खाल्ल्यानंतर वजन, फॅट, इन्सुलिन किंवा लिपिड प्रोफाइल तसंच रक्तदाब यामध्ये विशेष बदल झाला नाही.


या अभ्यासातून आंबा खाल्ल्यानंतर जास्त वजन आणि लठ्ठ व्यक्तींमध्ये कार्डिओमेटाबॉलिक जोखीम घटक दिसून आले. आंबा खाल्ल्याने वजन कमी होत नाही, तर वाढतं असंही काही तज्ज्ञ सांगतात. मुळात, आंब्यामध्ये कॅलरी आणि कार्ब जास्त असते, ज्यामुळे वजन वाढतं.


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आंबा खाल्ल्याने वजन कमी होत नाही. वेट लॉटसाठी, तुम्ही काही प्रमाणात आंबा खाऊ शकता, दररोज सुमारे 1 ते 2 स्लाइज. मात्र, जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन मोठ्या प्रमाणात टाळावं. जर तुम्ही आंबा मोठ्या प्रमाणात खाल्ले तर तुमच्या शरीराचे वजन कमी होत नाही.