HEALTH : शुभमन गिलला डेंग्यूची लागण, 8 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
ICC World Cup 2023 : आयसीसी वर्ल्ड कप 2023 (ICC World Cup 2023) ला सुरूवात झाली आहे. या दरम्यान भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिलबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
IND vs AUS : ICC क्रिकेट विश्वचषक 2023 ला गुरूवारपासून झाली आहे. मात्र याच दरम्यान भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर शुभमन गिल डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळणार की नाही यावर सस्पेन्स आहे. वृत्तानुसार, संघ व्यवस्थापन शुक्रवारी काही चाचण्या घेतील, त्यानंतर शुभमन गिल खेळणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
भारतीय क्रिकेटपटू शुभमन हा अतिशय हुशार फलंदाज आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी आजारी पडणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. मात्र, ते पहिला सामना खेळू शकतील की नाही हे सध्या तरी सांगणे कठीण आहे.
डेंग्यूची लागण होण्याच्या समस्या पुन्हा एकदा कानावर पडत आहेत. असं असताना काही घरगुती उपाय तुम्हाला डेंग्यूवर मात करायला मदत करतात. WebMD च्या रिपोर्टनुसार जाणून घ्या डेंग्यूचे 10 घरगुती उपाय.
स्वतःला हायड्रेट ठेवा
मोसंबी ज्यूस, नारळ पाणी, ORS चे पाणी याचा वापर करून स्वतःला हायड्रेट ठेवा. हायड्रेट ठेवल्यावर ताप, डोकेदुखी आणि स्नायूंमध्ये होणारा त्रास यापासून सुटका मिळते. लिक्विड डाएटमध्ये शरीरातील घाण बाहेर पडायला मदत होते.
आराम करा
डेंग्यूची लागण झाल्यावर पूर्ण बरे होण्यासाठी आराम करणे अत्यंत गरजेचे असते. मोबाइल, टिव्हीचा जास्त वापर यामुळे त्रास वाढू शकतो. अशावेळी कमीत कमी 8 तास आराम करणे गरजेचे असते.
थंड पाण्याने शेकवा
थंड पाणी वापरल्याने ताप आणि वेदना कमी होतात. अति तापामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या जळजळीपासूनही आराम मिळतो. आपल्या कपाळावर किंवा मानेच्या मागील बाजूस एक थंड, ओला टॉवेल ठेवा.
आहाराची काळजी घ्या
पोषक समृध्द अन्न खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि लवकर बरे होण्याची शक्यता वाढते. जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेले आहार निवडा, जसे की फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
कडुलिंबाच्या झाडाची पाने
कडुलिंबाच्या पानांमध्ये दाहक-विरोधी आणि विषाणूविरोधी गुणधर्म असतात जे डेंग्यू तापाची लक्षणे कमी करतात. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून तुम्ही कडुलिंबाचा चहा बनवू शकता.
पपईच्या पानांचा रस
पपईच्या पानांचा रस प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय मानला जातो. मुठभर पपईची पाने पाण्यात मिसळून तुम्ही पपईच्या पानांचा रस बनवू शकता.
गिलोय रस
गिलॉय ज्यूस हा एक जुना घरगुती उपाय आहे, ज्याचा उपयोग डेंग्यू तापासह अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. गिलॉय ज्यूसमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. गिलॉयचे २-३ तुकडे घेऊन ते पाण्यात उकळून गाळून घ्या. थंड झाल्यावर प्या.
जवसाचे पाणी
बार्ली वॉटर म्हणजे जवसाचे पाणी हे ताजेतवाने आणि हायड्रेटिंग पेय आहे जे ताप आणि मळमळ पासून त्वरित आराम देते. बार्लीचे पाणी तयार करण्यासाठी, बार्ली पाण्यात 30 मिनिटे उकळवा. उकळलेले पाणी गाळून प्यावे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)