मुंबई : पेज थ्री कल्चर जगणाऱ्या सेलिब्रेटी मंडळींचे अनुकरण करणे हे काही आपल्या समाजाला नवे नाही. पण, या उच्चभ्रू मंडळींचे अनुकरण तुम्ही डोळे झाकून करत असाल तर, सावधान. सेलिब्रेटींप्रमाणे हाय हिल्स वापरण्याच्या ट्रेण्डणे सध्या तरूणी आणि महिलांमध्ये जोर धरला आहे. अनेकदा तर, पतीला, बॉयफ्रेण्डला आवडते म्हणूनही हाय हिल्स वापर वापरल्या जातात. पण, तुम्हाला माहिती आहे का, हाय हिल्स वापरण्याचा जर अतिरेक झाला तर तुम्हाला विविध व्याधींना सामोरे जावे लागते. म्हणूनच हाय हिल्स वापरण्यापूर्वी ही माहिती जरूर वाचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, साधारण ५ इंचापेक्षा अधिक उंचीची हाय हिल्स अती प्रमाणात वापरली तर, त्या महिलेला गर्भधारणा होताना समस्या निर्माण होऊ शकतात. अशा महिलांमध्ये गर्भधारणेची गती मंदावते.


शारीरिक त्रासांचे आव्हान


डॉक्टरांच्या मते हाय हिल्स वापरणाऱ्या मुली, महिलांचे पायही तितके मजबूत असावे लागतात. जर तुमचे पाय अगदीच लुकडे असतील, तुमच्या पायाच्या टाचाही अगदीच सडपातळ असतील तर, तुम्हाला या समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागतात. कारण, तुमचे ओटीपोट पुढच्या बाजूला झुकते जे कमरेच्या दुखण्याला कारणीभूत ठरते. तुमच्या ओटीपोटात शरीराचे अनेक महत्त्वाचे घटक असतात. पण, तुमचे ओटीपोट जेव्हा पुढच्या बाजूला झुकते तेव्हा त्याचा संघर्ष पोटातील इतर घटकांशी होतो. ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता मंदावते. काही केसेसमध्ये तर डॉक्टर महिलांना वांजपणाच्या समस्येला तोंड द्यावे लागते असेही म्हणतात. हाय हिल्सचा महलांच्या मासिक पाळीशीही संबंध येतो. हाय हिस्समुळे मासिक पाळीचे चक्र बदलते. दरम्यान, हाय हिल्स सतत वापरल्याने कंबरदुखी, खांद्यांचे दुखणे, डोकेदुखी, केस गळणे, पाय दुखणे असा त्रास संभवतो. 


कमी वयात अधिक परिणाम


हाय हिल्स वापरण्याची फॅशन आजकाल लहान मुलींमध्येही पहायला मिळते. पण, त्याचा त्यांच्या शारीरिक, मानसीक जीवनावरही परिणाम होतो. हाय हिल्स वापरल्यामुळे पायांचे दुखणे, हाडे ठिसूळ होणे, पायांचा, पार्श्वभागाचा आकार बदलणे असा त्रास संभवतो.