मुंबई : मनुके आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. सर्दीच्या दिवसात मनुक्यांचं सेवन केल्याने दुप्पट फायदे होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शरीराला एनर्जी देण्यासोबतच मनुके हाडं देखील मजबूत करतात. फायबर, प्रोटीन, आयर्न, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 सारखी पोषक तत्वं मनुकामध्ये असतात. मात्र मनुक्यांचे आरोग्याला फायदे होत असले तरीही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजेत. कारण मनुक्यांचं अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला नुकसानंही होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहारतज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, तुम्ही एका दिवसात किती मनुका खात आहात यावर लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. खासकरून ज्या व्यक्ती लोक कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये.


मनुक्यांचं अतिप्रमाणात सेवन हानिकारक


पचन क्रियेवर विपरीत परिणाम


मनुकामध्ये भरपूर फायबर आढळते. हे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे, पण मनुका जास्त प्रमाणात खाल्ल्याने डायजेस्टिव्ह हेल्थवर विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे मनुक्याच्या अतिरीक्त सेवनाने डिहायड्रेशन, अपचन तसंच पोटासंबंधी त्रासंही जाणवतो.


त्वचेची एलर्जी


मनुके खाल्ल्याने काही लोकांना अॅलर्जीच्या समस्येलाही सामोरं जावं लागतं. काही लोकांना पहिल्यांदा मनुका खाल्ल्यानंतर आणि तुम्हाला त्वचेवर पुरळ उठण्याची तक्रार समोर येते. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर मनुक्याचं सेवन टाळा.


वजनात वाढ


मनुक्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा डाएट करत असाल, तर तुम्ही त्याचं मर्यादित प्रमाणात सेवन केलं पाहिजे.


ब्लड शुगर वाढते


मनुक्यामध्ये साखर आणि कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे त्याचे कमी प्रमाणात सेवन केल्यास फायदा होऊ शकतो. परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते.