मुंबई: आपल्या शरीरासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी रोज केळ खाणं केव्हाही चांगलं आहे. आयुर्वेदात तर केळ्याचं विशेष महत्त्व आहे. अॅसिडिटी असणारे, ज्यांना पोट साफ होत नाही अशा लोकांनी रोज केळ खायला हवं. मात्र केळ कसं कधी आणि केळ केव्हा खाऊ नये यासंदर्भातही काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. त्या पाळल्या नाहीत तर आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेच. पण अनेक वेळा जास्त पिकलेले केळं खाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.


तज्ज्ञांच्या मते, केळी पिकण्याची खास प्रक्रिया आहे. जास्त पिकलेलं केळ आरोग्यासाठी खाणं घातक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 


जास्त पिकलेली केळी खाणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. तुम्ही पिकलेल्या केळ्यावर पाहू शकता ते तुमच्या खाण्यासाठी योग्य आहे की नाही. केळ्यावर जर तपकिरी आणि पूर्ण काळे डाग पडले असतील तर ते केळ खाऊ नका. केऴ जास्त पिकल्याने त्यातील हेल्दी स्टार्च कमी होतात. त्याचं रुपांतर साखरेमध्ये होतं. तपकिरी साल असलेल्या केळ्यात साखरेचे प्रमाण जास्त असतं. असं केळ खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं. 


जास्त पिकलेल्या केळ्यात फायबरचं प्रमाण कमी असतं. व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन K ची मात्रा देखील कमी होते. पिवळ्या रंगाची केळी खाणं अधिक फायदेशीर असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामध्ये पोषक तत्वाचं प्रमाण जास्त असतं. बाजारात बऱ्याचदा केळी रसायनं टाकून पिकवली जातात आता अशी केळी कशी ओळखायची पाहा 


केळी कार्बाईडने पिकलेली आहे की नैसर्गिक? 
केळींची त्वचा गडद पिवळी आणि डागलेली असते. परंतु कार्बाईड किंवा केमिकल इत्यादींनी पिकवलेली केळी ही प्लेन आणि हलक्या पिवळ्या रंगाची असतात. तसेच, केळींचे शेवटचे टोक हे काळ्याऐवजी हिरव्या रंगाचे असतात, तसेच अशी केळी लवकर खराब होतात.


नैसर्गिकरित्या पिकलेली केळी गोड असतात आणि तुम्ही ती काही दिवस वापरू शकता.  परंतु रासायनिक किंवा केमिकल पद्धतीने पिकवलेली केळी ही खूप मऊ असताता, ती जास्त दिवस टिकत नाही. तसेच ही केळी काही ठिकाणी जास्त पिकलेली तर काही ठिकाणी कच्ची असतात.


टीप: (या लेखात प्रकाशित केलेली माहिती सामान्य माहिती आणि घरगुती उपचारांवर आधारित आहे. 'झी 24 तास' याला दुजोरा देत नाही. म्हणून लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.)