Side Effect of Curd in Summer: दही भारतातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांपैकी एक पदार्थ आहे. दही खाल्ल्याने पोटाला आणि शरीराला थंडावा मिळतो. तसेच दह्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे, दात आणि नखे मजबूत बनवण्याचे काम करते. तसेच दह्याचे नियमित सेवन केल्याने आपले स्नायू चांगले काम करतात. तसेच दह्याच्या नियमित सेवनाने मांसपेक्षी चांगल्या पद्धतीने काम करतात. दह्याच्या कूलिंग इफेक्टमुळे अनेकांना उन्हाळ्यात दही खायला आवडते. (side effects of eating to much curd in summer )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, साखर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी सारखे पोषक घटक दहीमध्ये आढळतात. ज्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदे मिळतात. हे इतके सगळे गुणधर्म असूनही दही खाताना काही गोष्टींची ही तितकीच काळजी घेतली पाहिजे. कारण दह्याच्या अतिसेवनमुळे फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया दह्याच्या अतिसेवनमुळे कोणते नुकसान होऊ शकते...


पोट फुगण्याची समस्या- काहीवेळेस दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोटाची उष्णता शांत करते. त्यामुळे अनेकजण थंडावासाठी दहीचे सेवन करतात. पण कधीकधी यामुळे पोटात गॅस आणि सूज देखील होऊ शकते. कारण दही पचायला जड असते. म्हणून ज्यांना पोटाचे आजार (Stomach ailments) असतील जसे की, गॅस आणि पोट फुगण्याची समस्या असेल त्यांनी दह्याचे सेवन करू नये.


वाचा : कितीही डायटिंग करा, 'या' कारणांमुळे तुमचे वजन होणार नाही कमी, वाचा असे का होते?


युरिक ऍसिड- यूरिक ऍसिड (uric acid) जास्त असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा लोकांनी दही अजिबात खाऊ नये, कारण दह्यामध्ये भरपूर प्रोटीन असते जे यूरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी हानिकारक असते. दह्यामध्ये असलेले ट्रान्स फॅट यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढवण्याचे काम करते. 


दम्याचे रुग्ण - दम्याच्या (Asthma patients) रुग्णांनी आपल्या आहारात दह्याचा समावेश करू नये. ते खाल्ल्याने श्वसनाची संबंधित त्रास वाढू शकतो. दह्यामध्ये कूलिंग इफेक्ट जास्त प्रमाणात असतो, ज्यामुळे दम्याच्या रुग्णांना सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या उद्भवू शकतात.


सांधेदुखीचा आजार - ज्या लोकांना सांधेदुखीचा (Rheumatoid arthritis) आजार असेल त्यांनी दह्याचे सेवन करु नये. दह्यामध्ये जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट आणि अॅडव्हान्स ग्लायकेशन असल्यामुळे हाडांची घनता कमी होऊ लागते. त्यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी दह्याचे सेवन केल्याने त्यांचे गुडघेदुखी आणि सूज वाढू शकते.


बद्धकोष्ठता - जर तुमची पचनक्रिया आधीच कमकुवत असेल तर रोज दही खाणे टाळा. पचनसंस्था नीट काम करत नसेल तर दही खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. (Constipation)


 


 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)