मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कलिंगड, टरबूज यासारखी पाण्याचा अंशअधिक असलेली फळं आहारात घेतली जातात. उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरते मात्र चूकीच्या पद्धतीने किंवा अतिप्रमाणात कलिंगड खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.  या टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंगड गोड आणि रसदार आहे


कसं ठरतं कलिगंड आरोग्याला नुकसानकारक?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलिंगडामध्ये लायकोपीन घटक मुबलक आढळतात. शरीरात या घटकाचे अधिक प्रमाणात सेवन झाल्याने नुकसान होते. त्यामुळे अधिक कलिंगड खाल्ल्याने डायरियाचा त्रास होऊ शकतो.  


कलिंगडामध्ये पोटॅशियम घटकही असतात. शरीरात पोटॅशियम घटकाचे प्रमाणही वाढल्यास आरोग्याला त्रास होऊ शकतो. यामुळे हृद्याची धडधड अधिक वेगवान होऊ शकते. म्हणूनच पोटॅशियमचा मुबलक साठा असलेल्या केळ्याचा, संत्री, टॉमेटो अशा फळांचा अधिक प्रमाणात समावेश झाल्यास त्यापाठोपाठ कलिंगड खाणार असाल तर त्याचे सेवन थोडे कमी करा. 


मधुमेहींनी एकावेळी भरपूर प्रमाणात कलिंगड खाल्ल्यास त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढू किंवा कमी होऊ शकते.  


तुम्ही अल्कोहलचे सेवन केलेले असल्यास त्यानंतर 12 तासात कलिंगड खाऊ नका.  यामुळे यकृताचं कार्य बिघडू शकते.  


उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी कलिंगडाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 


उन्हातून आल्यानंतर लगेजच कलिंगडाचे सेवन करू नका. यामुळे उलटीचा त्रास होऊ शकतो. 


गरोदर स्त्रीयांनीदेखील आहारात कलिंगडाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.