मुंबई : आंबा हे उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. या हंगामात आंब्याचे उत्पादन जास्त होते. काही जण फक्त आंब्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहत असतात. पण ज्यांचे वजन जास्त आहे, किंवा जे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर अशा लोकांनी आंबा खावा की नाही? या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थीत होतात. आंब्याच्या सेवन खरंत तुमचं वजन वाढत आहे का, याचे भान ठेवणेही गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की आंब्याचा वजनावर कसा परिणाम होतो.


वजन आणि आंब्याचा संबंध काय?


काही लोकांना असे वाटते की, आंब्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पण तसे नाही. आंबा खाल्ल्याने वजन कमी होत नाही. मात्र, जर तुमचे वजन कमी होत असेल, आणि तुम्हाला ते वाढवायचं असेल, तर तुम्ही आहारात आंब्याचा सहज समावेश करू शकता.


वजन कमी करण्यासाठी आंबा कसा खावा?


तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सर्वात आधी आंबा खाणं टाळा. कारण आंबा खाल्याने जास्त प्रमाण शरीराचे वजन वाढवू शकते. आंब्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुमच्या शरीरात जास्त कॅलरी होतात, तेव्हा तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास फायदेशीर नसला, तरी हानी होऊ शकतो आणि तुमचे वजन वाढू शकते.


तसेच अनेकांना जेवल्यानंतर आंबा खाण्याची सवय असते. परंतु हे लक्षात ठेवा की, कधीही जेवल्यानंतर आंबा खाऊ नये. कारण यामुळे तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज जमा होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो आंब्याचे सेवन दुपारी करा किंवा स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही त्याला खाऊ शकता. परंतु रात्री जेवल्यानंतर कधीही आंबा खाऊ नका.