मुंबई : कांदा जसा जेवणात वापरण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. तसंच जीभेचे चोचले पुरवण्यासाठी जेवणासोबत कांदा खाणं हेही एक सूत्र बनलं आहे. कांदा खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहीत असतील पण अति प्रमाणात कांद्याचे सेवन करणं धोक्याचं ठरू शकतं. कांद्याच्या अतिसेवनामुळे तोटे होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांद्याचं अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे तुम्ही जर कांदा जास्त खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज जाणून घेऊया कांद्याचे तोटे काय आहेत. 


कांद्यामध्ये ग्लूकोज आणि फ्रूटोजचं प्रमाण अधिक असतं. फायबरचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे कांदा पचनासाठी जड असतो. ज्यांना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांना तर कच्चा कांदा अॅसिडिटी वाढवू शकतो. ज्यांना नाही त्यांना अतिसेवनानं ती होण्याचा धोका आहे. 


मधुमेह असणाऱ्यांनी किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी कच्चा कांदा खाण्याआधी आवश्य डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी कच्चा कांदा धोक्याचा ठरू शकतो. 


जर तुम्हीही कच्चा कांदा जास्त प्रमाणात खात असाल तर काळजी घ्या, कारण यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. म्हणजेच कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाणे टाळा.


कच्च्या कांद्याचे जास्त सेवन केल्याने तोंडातून दुर्गंधी येण्याची तक्रार देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत जास्त कांदा न खाण्याचा प्रयत्न करा, जर खाल्ला तर तोंड स्वच्छ धुवा.