मुंबई : हळदीला आयुर्वेदात मोठं स्थान आहे. हळदीला वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जाते. कारण जवळ जवळ सगळ्याच लहान मोठ्या आजांरावर हळद ही फार उपयुक्त आहे. परंतु तुम्हाला जर सांगितले की, हळदीचे काही साईड ईफेक्ट्स पण आहेत, तर तुमचा विश्वास बसेल का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु हे खरं आहे. काही गोष्टींसाठी हळद ही अपायकारक आहे. ज्या लोकांना ज्यांना यकृताशी संबंधित कोणतीही समस्या असेल, त्यांनी तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कधीही हळदीचे दूध पिऊ नये. अशा लोकांसाठी, हळदीचे दूध एक ट्रिगर म्हणून काम करते. जी त्यांची समस्या वाढवू शकते.


ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे किंवा ज्यांना ऍनिमिया आहे, अशा लोकांनी हळदीचे दूध कधीही पिऊ नये. हळदीचे दूध शरीरात जाऊन जलद लोह शोषण्याचे काम करते. यामुळे शरीरात लोहाची कमतरता अधिक होते, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते आणि अशक्तपणाची समस्या वाढते.


गर्भवती महिलांनी हळदीचे दूध पिऊ नये. हळदीचे दूध पोटातील उष्णता वाढवते. अशा परिस्थितीत गर्भाशयाचे आकुंचन, रक्तस्त्राव किंवा गर्भाशयात क्रॅम्पची समस्या असू शकते. हळदीच्या दुधामुळे पहिल्या तीन ते चार महिन्यांत गर्भपात होण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी ते पूर्णपणे टाळावे.


गरम पदार्थ खाल्ल्यानंतर काही लोकांना उष्णता, अस्वस्थता, पुरळ, खाज, ऍलर्जी इत्यादी समस्या येऊ लागतात किंवा ज्यांचे शरीर खूप गरम गोष्टी सहन करू शकत नाही. अशा लोकांनी हळदीचे दूध पिऊ नये. त्यांच्या गरम प्रभावामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता आणखी वाढू शकते. यामुळे इतर समस्याही वाढू शकतात.


पित्ताशयाशी संबंधित काही समस्या असल्यास किंवा पित्ताशयामध्ये दगड असल्यास तुम्ही हळदीचे दूध पिऊ नये. यामुळे तुमची समस्या आणखी बिकट होऊ शकते.