मुंबई : तुमचंही प्रमाणापेक्षा वजन वाढलंय? दिवसेंदिवस तुम्हीही लठ्ठ होताय? आजकाल वाढलेलं वजन तसंच बेली फॅट कमी करणं ही बहुतांश लोकांसाठी मोठी समस्या आहेत. डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट कसं करावं हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हीही यापूर्वी वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग निवडले असतील. वजन कमी करत असताना एक समस्या सतत जाणवते ती म्हणजे बेली फॅट. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. चला जाणून घेऊया काही नैसर्गिक उपाय ज्यांच्या मदतीने तुम्ही बेली फॅट कमी करू शकता.


कोमट पाणी आणि लिंबू


बेली फॅटपासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. तुम्ही त्यात मधही घालू शकता. हे केवळ लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी ठरत नाही तर चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर ठरण्यास मदत होते.


साखर बंद करा


साखरेमध्ये कॅलरीजचं प्रमाण अधिक असतं जे आपल्या शरीरात वजन वाढवण्याचं काम करतं. म्हणूनच पांढऱ्या साखरेपासून दूर राहणं फायदेशीर ठरेल. मात्र फळांमध्ये असते तशी साखर नैसर्गिक स्वरूपात खाणं चांगलं आहे. याशिवाय तुम्ही मध किंवा गूळाचा वापर करू शकता.


अधिक पाणी प्या


पाणी हे आपल्या जीवनाचं अमृत आहे. अतिरिक्त चरबीपासून मुक्त होण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी पर्याय आहे. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यायलं पाहिजे. असं केल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि वजन कमी करण्यास मदत होईल.