मुंबई : भारताला लवकरच कोरोनाची अजून एक लस उपलब्ध होणार आहे. ड्रग्ज कंट्रोलरने भारतात रशियाच्या स्पुतनिक लाईटची चाचणीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. ही सिंगल डोस लस आहे. म्हणजेच या लसीच्या केवळ एका लसीने कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने स्पुतनिक लाईटला भारतात तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजूरी दिलेली नाही. कोरोनासंदर्भात सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने स्पुतनिक लाईट चाचणीसाठी मंजूर करण्याची शिफारस केली होती.


याआधी जुलैमध्ये, सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने भारतामध्ये रशियाच्या आणीबाणीच्या वापरासाठी सिंगल-डोस लस मंजूर करण्याची शिफारस केली होती, परंतु भारतात चाचणी न झाल्यामुळे सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने ती नाकारली होती.


समितीने सांगितलं की, स्पुतनिक लाइटमध्येही स्पुटनिक-व्ही सारखेच घटक आहेत. म्हणून, भारतीय लोकसंख्येवरील त्याच्या संरक्षणाचा डेटा आणि एंटीबॉडी आधीच तयार आहेत.


अलीकडील लॅन्सेट अभ्यासातून असं दिसून आले आहे की, कोरोना विरुद्ध स्पुटनिक लाइटची प्रभावीता 78.6% ते 83.7% दरम्यान आहे. जे दोन्ही डोस लसीपेक्षा खूप जास्त आहे. अर्जेंटिनामधील 40 हजारांहून अधिक वृद्धांवर हा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात असंही दिसून आले की, स्पुतनिक लाइट लस रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 82.1% वरून 87.6% पर्यंत कमी करते.