मुंबई : कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. त्याची निर्मिती लिव्हरमध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते. पण याची निर्मिती गरजेपेक्षा अधिक झाल्यास ते शरीरात जमा होऊ लागते. त्यामुळे अनेक शारीरिक आजारांना निमंत्रण मिळते. रक्तात कोलेस्ट्रॉल वाढू लागल्यास याचा थेट परिणाम हृदयावर होतो आणि हृदयासंबंधित आजार उद्भवू लागतात. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अॅटकच्या धोका वाढतो. पाहुया शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची ही काही लक्षणे...


लवकर थकवा येणे, धाप लागणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडेसे चालल्यावर थकवा जाणवतो का? किंवा धाप लागते का? मग शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचा हा इशारा आहे. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.


सातत्याने पाय दुखणे


विनाकारण पाय दुखत असतील तर हा कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत आहे. त्यामुळे या त्रासाकडे दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.


 खूप अधिक घाम येणे


घाम येणे सामान्य आहे. पण गरजेपेक्षा अधिक घाम येत असल्यास शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचा हा संकेत आहे. 


अचानक वजन वाढणे


सतत वजन वाढत असल्यास किंवा सतत बॉडी हेव्ही वाटत असल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले असू शकते.


रक्तदाब वाढणे


रक्तदाब अचानक वाढणे हे कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढण्याचा इशारा आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब चेकअप करुन घ्या.


छातीत दुखणे किंवा बैचेन वाटणे


शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने छातीत दुखू लागते. त्याचबरोबर बैचेन वाटते.


हृदयाची गती वाढणे


शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते. हृदयाची गती वाढण्याचा त्रास तुम्हालाही होत असल्यास कोलेस्ट्रॉलची तपासणी करुन घ्या.