तासभर बसून राहणे हे धूम्रपान कारण्याइतकचे धोकादायक !
आजकालच्या गुंतागुंतीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे फारसे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.
नवी दिल्ली : आजकालच्या गुंतागुंतीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे फारसे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे जेवणाच्या अयोग्य वेळा, अपुरी झोप, कामाचा ताण या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागतो. त्यातच सध्याच्या स्पर्धेच्या युगात कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे कुटुंबासोबत देखील वेळ घालवता येत नाही. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ताण, टेन्शन. शारीरिक आणि मानसिक देखील. या सगळ्यामुळे माणूस चुकीच्या सवयींकडे ओढला जातो. मग ताण दूर करण्यासाठी धूम्रपान अगदी सहज केले जाते. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होते, हे आपण जाणतोच. मात्र धूम्रपान इतकीच आपली एक सवय देखील धोकादायक आहे. ती सवय नसून आपल्या कामाचा एक भाग आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. ते म्हणजे तासंतास एकाच जागी बसून राहणे. अनेकदा गप्पा मारताना, कोणाची वाट बघताना आणि अगदी कार्यालयात देखील आपण दिवसभर कॉम्प्युटर समोर बसून असतो. ही बैठी जीवनशैली धोकादायक आहे. धूम्रपान कारण्याइतकाच धोका देखील एक तास बसून राहण्यात आहे.
९ हजार लोकांवर एक प्रयोग करण्यात आला. त्यात असे दिसून आले की, एका तासाहून अधिक वेळ बसल्यास मेटाबॉलिझम कमी होते. परिणामी कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणाबाहेर जाते. शोधात हाती आलेल्या माहितीनुसार, शारीरिक कष्ट कमी झाल्याने किंवा त्यातील अनियमिततेमुळे हृद्यासंबंधित आजार होण्याची शक्यता ६% तर मधुमेहाचा धोका ७% आणि ब्रेस्ट कॅन्सरची संभावना १०% वाढते. ३.५ कोटी मृत्यूचे कारण स्थूलता असल्याचे यापूर्वी झालेल्या एका अमेरिकेच्या शोधातून दिसून आले होते.
अधिक वेळ बसल्याने मृत्यूचा धोका वाढतो :
जर्नल सकरुलेशननुसार, ऑफीसमध्ये काम करणारे अधिकतर लोक ९-१० तास बसलेले असतात. त्यात त्यांना फक्त ७ तासांची झोप मिळते. या सगळ्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या शोधातून असे दिसून आले की, नवीन पिढीसाठी तासंतास बसून राहणे हे धूम्रपान करण्याइतकेच धोकादायक आहे. या शोधानुसार एका तासाहून अधिक वेळ टीव्ही बघितल्यास मृत्यूचा धोका ११% वाढतो.
अनेक संस्थामध्ये कामाचे स्वरूप बदलले :
या धोका लक्षात घेता काही संस्थांमध्ये उभे राहून काम करण्याचे कल्चर स्विकारले गेले आहे. अशा ठिकाणी काम करण्यासाठी थोडे उंच डेस्क बनवले गेले आहे. त्याचबरोबर जर दिवसाला ५ मिटींग्स असतील तर त्यातील २ वॉक मीटिंग किंवा हायकिंग मीटिंग करण्याची शक्कल काढण्यात आली आहे.