मुंबई :  त्वचेवर साचलेला मळ आणि मृत पेशींचा स्तर काढून टाकण्यासाठी स्क्रबरचा वापर करणं गरजेचे असते.यामुळे त्वचा मुलायम आणि अधिक सतेज होते. पण नियमित त्याचा वापर करणंदेखील त्रासदायक ठरू शकते. स्क्रबरचा फायदा होण्याऐवजी त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता दाट असते. कोणत्या ३ परिस्थितींमध्ये बॉडी स्क्रबर वापरू नये याकरिता डॉ. सेजल शहा यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 स्कीन लाईटनिंग एजंट - हायपर पिगमेंटेशनचा त्रास कमी करण्यासाठी स्कीन लाईटनिंग एजंटस वापरले जातात.अशावेळेस त्वचेवर स्क्रबरचा वापर केल्यास त्रास अधिक वाढतो.  


सनबर्न झाल्यानंतर - खूप काळ रखरखत्या उन्हांत उभं राहिल्यास सनबर्नचा त्रास होतो. अशावेळेस त्वचेची जळजळ वाढवणार्‍या ब्युटी ट्रीटमेंट्स करणं कटाक्षाने टाळा. सनबर्नचा त्रास झाल्यानंतर स्क्रबरऐवजी त्वचेमध्ये मुलायमपणा वाढवण्यासाठी कोरफडीचा गर किंवा क्लिन्जिंग ऑईल याचा वापर करावा. 


केमिकल बॉडी पिल ट्रीटमेंट -  या ब्युटी ट्रीटमेंटमध्ये त्वचेवरील काही ठराविक थर केमिकल्सच्या मदतीने काढला जातो. त्यामुळे अशावेळेस स्क्रबर वापरून त्वचेचे अधिक नुकसान करणं टाळा. पिलिंग किंवा निघणारा त्वचेचा स्तर मुद्दामून खेचणंदेखील टाळा. अन्यथा त्वचेला नुकसान, जळजळ आणि हायपरपिंगमेंटशनचा त्रास होऊ शकतो. अशावेळेस नियमित त्वचेवर मॉईश्चरायझर क्रीम लावा.