Rat Bites Dangerous Side Effects : सहा महिन्यांच्या बाळाला उंदरांनी कुरडतून काढलं आहे. आई-वडील गाढ झोपेत असताना ही घटना घडली आहे. बाळाच्या शरीरावर जवळपास ५० हून अधिक जखमा उंदराच्या चावण्याने झाल्या आहेत. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. सहा महिन्याच्या बाळाच्या चेहऱ्याला आणि हाता-पायांच्या बोटांना उंदराने चावलं आहे. यामध्ये त्याला ५० हून अधिक जखमा झाल्या आहेत. उंदराने लहान बाळाला चावण्याची ही पहिलीच घटना नाही. या अगोदरही अशा घटना घडल्या आहेत. बाळांची बोटे नाजूक असतात. ही घटना अमेरिकेतील इंडियाना परिसरात घडली आहे. उंदिर चावल्यावर काय लक्षणे दिसतात आणि त्यावर घरगुती उपाय काय जाणून घ्या. 


उंदीर चावल्यावर काय करावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उंदीर शरीराच्या ज्या भागावर चावले तो भाग स्वच्छ करून घ्या. तो भाग गरम पाण्याने साफ करून घ्या. तो भाग स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि त्यावर अँटीबायोटिक क्रिम लावा. यानंतर लगेचच डॉक्टरला सांगा. जरी उंदराच्या चावण्याची जखम दिसत नसेल तरीही त्याचा व्हायरस पसरू शकतो. त्यामुळे याला हलक्यात घेऊ नका. 


या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष 


Healthline च्या रिपोर्टनुसार, काही प्रकरणात रुग्णाला अँटीबायोटिक्स दिले जाते. या दरम्यान रुग्णाच्या लक्षणांमध्ये काही बदल तर होत नाहीत ना याकडे देखील लक्ष द्या. उंदीर चावलेल्या भागाचा रंग तर बदलत नाही ना किंवा त्या भागाटी जखम अजून चिखलत तर नाही ना याकडे लक्ष द्या. कधी कधी या जखमेत पू तयार होऊ शकतो. तसेच ताप येणे, त्रास होणे, थंडी वाजणे आणि सांधेदुखीचा त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. 7 ते 10 दिवस अँटीबायोटिक घेणे आवश्यक आहे. 


घरगुती उपाय 


उंदीर चावल्यावर काही घरगुती उपाय ठरतील फायदेशीर. उंदीर चावलेल्या भागावर मुळ्याचा रस लावाव. तसेच सुके खोबरे किसून त्या भागी लावावे. हा उपाय दिवसातून 2 ते 3 वेळा करावा, यामुळे होणाऱ्या संक्रमणापासून तुम्ही वाचू शकता. तसेच चवळीच्या भाजीचे चार ग्रॅम चूर्ण घ्यावे आणि त्यासोबत मध घ्यावे. याचे दिवसातून चार वेळा सेवन केल्यास संक्रमणाचा धोका कमी होतो. उंदीर चावल्यामुळे शरीरावर होणारा घातक परिणाम कमी होतो.