मुंबई :  दूध हे पूर्ण अन्न मानले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूधाचा वापर आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. अवेळी लागणार्‍या भूकेवर दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पित्तासारख्या समस्येवर नियंत्रण ठेवता येते. पण दूध जसे शरीराला बळकटी देते तसेच त्वचा आणि केसांचेदेखील आरोग्य सुधारते. 


त्वचा स्वच्छ करते -


त्वचेवरील घाण, मळ काढण्यासाठी बाजारात अनेक क्लिंजर उपलब्ध आहेत. मात्र दूधाचा वापर अधिक फायदेशीर ठरतो. दूध हे उत्तम आनि घरात सहज उप्लब्ध होणारे क्लिंजर आहे. 


एक्सफ्लोईट  -


त्वचेवरील डेड स्कीनचा थर काढून टाकण्यासाठी दूध मदत करते. यामुळे त्वचेला तजेला मिळतो. कच्च दूध त्वचेवर लावा. यानंतर हलक्या हाताने मसाज करा. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.  


सन टॅन 


टॅन होण्याची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी कच्च आणि थंड दूध फायदेशीर आहे. त्वचेवर कच्च्या दूधाचा मसाज करा. यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. दूधातील लॅक्टिक अ‍ॅसिडमध्ये ब्लिचिंग क्षमता असते. त्यामुळे त्वचा टॅन होण्याची शक्यता कमी होते. 


मऊसूत केस 


केसांना मऊसूतपणा देण्यासाठी दूध फायदेशीर ठरते. तुमचे केस रफ झाले असतील तर केसांना कच्च्या दूधाचा मसाज करा. त्यानंतर आंघोळ करा.  


पायांचा भेगा 


पायांच्या भेगाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी दूधदेखील फायदेशीर ठरते. पायांवर दूधाचा हलका मसाज करा. त्यानंतर पाय धुवावेत. हा उपाय रात्रीच्या वेळेस केल्यास अधिक फायदेशीर ठरतील.