Skin Care Tips : तुम्हाला ही चेहऱ्यावर रिंकल्स, फाइन लाइंस आहेत का? तर हे टाळा...
आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्ही वापर कमी केल्यास तुमच्या त्वचेसंबंधातील समस्या कमी होऊ लागतील.
Skin Care Tips : वाढत्या वयात जसे आपले शरीर थकते तसाच आपला चेहरा (Skin) ही थकतो. आपल्याला तजेलदार राहायचे असल्यास आहारात पोषक तत्वे नियमितपणे घेतली पाहिजेत. आपल्या आहारात ज्या गोष्टींचा आपण समावेश करतो त्याचा आपल्या जीवनावर देखील परिणाम होत असतो. आपली लाईफस्टाईल (Lifestyle), फिटनेस (Fitness) आणि ब्यूटी (Beauty) यांच्यावर फरक जाणवत असतो. (Skin Care Tips Do you have wrinkles fine lines on your face So avoid this NZ)
अनेकदा कमी वयातच आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स (Wrinkles) आणि फाइन लाइन्स (Fine lines) सारख्या समस्या दिसू लागतात. जसे वय वाढू लागते तसे आपली त्वचा सैल होते आणि सुरकुत्या पडण्याची समस्या वाढू लागते. आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्ही वापर कमी केल्यास तुमच्या त्वचेसंबंधातील समस्या कमी होऊ लागतील.
आणखी वाचा - PCOS : महिलांनो तुम्हाला ही होतोय का पीसीओएसचा त्रास... जाणून घ्या लक्षणे
1. तळलेले पदार्थ (Fried Food)
अनेकदा आपल्याला तळलेले पदार्थ दिसल्यास स्वत:वरचा ताबा सुटतो आणि त्या पदार्थांचा मोहात पडतो. तळलेले पदार्थ आपल्या शरीरासाठी उपयुक्त नसतात. त्याने आपल्याला त्रास व्हायला सुरु होते. कधी कधी तळलेले पदार्थ खाण्यास हरकत नाही.
2. साखर (White Sugar)
आरोग्यतज्ञ साखर खाण्यास मनाई करतात. आपल्या रुटीनमध्ये साखरेचे प्रमाण असल्यास आपल्या चेहऱ्यावरील ग्लो देखील जाण्याची शक्यता असते. तळलेले पदार्थांप्रमाणेच साखरेत कोलेजनचे (collagen) प्रमाण असते ज्यामुळे आपल्याला त्वचेवर रिंकल्स,फाइन लाइंस सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
3. लोणी (butter)
एका रिसर्चच्या मते जे लोक त्यांच्या आहारात लोणी घेत नाहीत अशा व्यक्तींना रिंकल्स, फाइन लाइंस सारख्या त्वचेचे त्रास होत नाहीत. त्यात असणारे कोलेजन आणि इलास्टिसिटी सारखे घटक त्वचेला हानी पोहचवतात.
आणखी वाचा - जाणून घ्या... रात्री झोपायची योग्य पद्धत आणि दिशा
4. डेयरी (Dairy)
काही लोक डेयरीचे पदार्थ शरीरासाठी उपयुक्त समजतात तर काही हानीकारक. डेयरीचे पदार्थ आपल्या नियमित आहारात असल्यास त्वचेचा समस्या उद्धभवू लागतात. वैज्ञानिक दृषट्या डेयरीच्या पदार्थांमुळे शरीराला सूज येते ज्यामुळे ऑक्सीडेटिव स्ट्रेस तयार होतो. ऑक्सीडेटिव स्ट्रेसमुळे तुम्ही वयाच्या आधीच म्हातारे दिसू लागता.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)