Remove Old Scars: कधीकधी आपल्याला दुखापत होते अशावेळेस काही दुखापतींच्या खुणा वेळीच चांगल्या होतात तर काही खुणा इतक्या खोल असतात की ते आयुष्यभरासाठी आपल्यासोबत राहतात मग अशावेळेस त्या खुणांपासून मुक्त होण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो पण त्यातून मुक्त होणे थोडे कठीण होते पण अवघड नसते आज आम्ही तुम्हाला अशा खुणांपासून मुक्त होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत...(Skin Care Tips Want to get rid of acne on your face Follow some awesome tips nz)


हे ही वाचा - दिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या



या खुणांपासून मुक्त होण्याचा मार्ग -


1. कोरफड जेल (Aloe gel)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरफडीचे अनेक फायदे आहेत. अशा स्थितीत तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह असल्यास कोरफडीच्या पानाचा फक्त वरचा थर काढून आतील भागाचा वापर करा. यानंतर हा भाग तुमच्या खुणांवर लावा. अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने धुवा, असे केल्याने जुन्या खुणा दूर होऊ शकतात.


2. खोबरेल तेल (Coconut oil)


जर तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर तुम्ही खोबरेल तेल देखील वापरू शकता. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.


3. व्हिनेगर (Vinegar)


व्हिनेगरची चव खायला चांगली नाही पण त्याचे फायदे अनेक आहेत. केसांची निगा राखणे असो किंवा शरीरावरील जखमांच्या खुणा काढून टाकणे असो. अशावेळी व्हिनेगर खूप फायदेशीर आहे. कोणत्याही जखमा काढून टाकण्यासाठी, कापसात पाणी आणि व्हिनेगर मिसळा आणि आपल्या जखमांवर लावा. हे रोज झोपण्यापूर्वी करावे लागेल.


हे ही वाचा - बॉलिवूड अभिनेत्याचे 'ते' शब्द आणि नेहाच्या डोळ्यात आले पाणी..., पाहा Video


 


4. लिंबू (lemon)


लिंबूमध्ये ब्लिचिंग एजंट आढळते. हे कॉस्मेटिकमध्ये देखील वापरले जाते. जर तुमच्या शरीरावर जखमेच्या खुणा असतील आणि तुम्हाला ते हलके करायचे असेल तर तुम्ही लिंबाची मदत घेऊ शकता.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)