मुंबई : आपण सर्वांसमोर सुंदर आणि चांगले दिसावे असे सगळ्यांना वाटत असतं. म्हणून तर कार्यक्रम, पार्ट्या किंवा ऑफिसला जाताना अनेक लोक चांगलं तयार होऊन जातात. चांगले कपडे, चांगली चप्पल, बॅग, ब्रँडेड घड्याळ असं सगळं घालून लोक बाहेर पडतात. परंतु हेच पुरेसं नसतं, चांगलं दिसण्यासाठी चांगल्या स्किनची देखील गरज असते. यासाठी अनेक लोक ब्युटीपार्लरमध्ये जाऊन फेशल, ब्लीच अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट करतात. तुम्ही देखील पार्लरमध्ये जाऊन ब्लीच करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. (Skin Care Tips)


त्या गोष्टी कोणत्या आहेत? चला जाणून घेऊ या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल बहुतेक लोक चेहऱ्यावर ब्लीचचा वापर करतात. ब्लीच लावल्यानंतर चेहऱ्याला चमक येते. पण काही वेळा ब्लीच केल्यानंतर त्वचेला खाज सुटण्याची आणि सूज येण्याची समस्या उद्भवते. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही ब्लीच केल्यानंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी. (Skin Care Tips)


ब्लीच केल्यानंतर बर्फ लावा


ब्लीच केल्यानंतर चेहऱ्यावर जळजळ, सूज येण्याची समस्या होते. अशा परिस्थितीत, ब्लीचिंग केल्यानंतर तुम्ही बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्याला मसाज करा. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जळजळ किंवा सूज येण्याची समस्या राहणार नाही.


ब्लीच केल्यानंतर थ्रेडिंग टाळा


ब्लीचिंगनंतर तुम्ही थ्रेडिंग करणे किंवा आपर लिप्स करणं टाळा. कारण ब्लीच केल्यानंतर त्वचा संवेदनशील होते. त्यामुळे अशा वेळी स्किन खेचली गेली तर, तुमची जळजळ वाढते. म्हणूनच तुम्ही ब्लीच केल्यानंतर थ्रेडिंग टाळावे.


सुर्याच्या किरणांपासून लांब राहा


ब्लीच केल्यानंतर उन्हात जाणे टाळावे. कारण ब्लीच झाल्यानंतर उन्हात जाण्याने त्वचेवर लालसरपणा येतो. एवढेच नाही तर ब्लीच केल्यानंतर उन्हात गेल्याने त्वचेला जळजळ होण्याचीही तक्रार उद्भवते. त्यामुळे ब्लीच लावल्यानंतर उन्हात जाणं टाळावं.


ब्लीच केल्यानंतर स्क्रब करू नका


ब्लीचिंगनंतर स्क्रबिंग टाळावे. तसे, स्क्रबिंग हा त्वचेच्या काळजीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण ब्लीच नंतर स्क्रबिंग टाळावे. कारण त्यामुळे खाज येऊ शकते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)