Skin Care : तुम्ही बहुविध कारणांसाठी केले जाणारे नानाविध उपवास पाहिलेच असतील. सध्या असाच एक उपवास चर्चेचा विषय ठरत आहे. पण, तो कोणत्या अध्यात्मिक किंवा धार्मिक कारणासाठी करण्यात येत नाहीये हेसुद्धा तितकंच खरं. हा उपवास केला जातोय स्वत:साठी, स्वत:च्या त्वचेसाठी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्यचकित झालात? महिलावर्ग गेल्या काही काळापासून या न त्या मार्गानं स्वत:च्या त्वचेची काळजी घेताना दिसत आहे. त्वचा स्वच्छ करण्यापासून सीरम, टोनर, वगैरे वगैरे गोष्टी लावत तर काहीजणी घरचं साहित्य वापरून त्वचेचं सौंदर्य टिकवू आणि आणखी खुलवू पाहत आहेत. आयुष्यातील दर दिवसाच्या शर्यतीत काहीजणींना मात्र हे सहजासहजी शक्य होत नाही. अशा परिस्थितीतही म्हणे अनेकींनी यावरही तोडगा शोधून काढला आहे. हा पर्याय म्हणजे Skin Fasting चा.


स्किन फास्टींग म्हणजे काय? 


'वोग'नं जाणकारांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार स्किन फास्टिंग ही एक अशी संकल्पना जिथं तुम्ही असंख्य सौंदर्यप्रसाधनं, उत्पादनं आणि तत्सम गोष्टींपासून त्वचेला जाणीवपूर्वक दूर ठेवणं आणि नैसर्गिकरित्या त्वचेला पुन्हा संतुलिच होण्यासाठी पुरेसा वेळ देणं. सोप्या शब्दांत सांगावं तर, भरमसाट उत्पादनांचा वापर करण्याऐवजी कमीत कमी गोष्टींचा वापर करत त्वचेच्या नैसर्गिक गुणधर्मांना सक्रिय करणं. 


स्किन फास्टींगच्या या प्रक्रियेमध्ये क्लिन्झर, टोनर, सीरम आणि एक्सफोलिएंट्सचा वापर टाळणं हा मुख्य हेतू असतो. यादरम्यान तुम्ही एखादं साधं मॉईश्चरायझर वापरून त्वचेचील ओलावा कायम ठेवू शकता. 


हेसुद्धा वाचा : दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न! पुढल्यावर्षी सर्वांचा पगार...; प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी Good News


तुम्हाला माहितीये का, त्वचेमध्ये असेर काही गुणधर्म असतात जे रासायनिक उत्पादनांचा वापर कमी केल्यास सक्रिय होतात आणि pH levels नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. ज्यांची त्वचा अती संवेदनशील आहे त्यांनाही या प्रक्रियेतून फायदा मिळतो. सातत्यानं त्वचेवर विविध उत्पादनांचा वापर केल्यास  dehydration आणि dryness अशा समस्या सतावतात. त्यामुळं या अडचणी खरेदी दूर करण्यासाठी एकदा हा मार्ग अवलंबण्यास हरकत नाही.