त्वचा आणखी नितळ करण्याच्या प्रयत्नांत आहात, `ही` ट्रीटमेंट ठरेल उत्तम पर्याय
ही एक अशी प्रक्रिया आहे जी तुमची त्वचा एक्सफोलिएट करते आणि त्वचेच्या डेड सेल्स काढून टाकण्यास मदत करते.
मुंबई : मुलायम आणि चमकदार त्वचा प्रत्येकाला हवी असते. यासाठी विविध मास्क तसंच इतर गोष्टींचा वापर केला जातो. मात्र जर तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर स्किन पॉलिंशिंग हा पर्याय तुम्ही वापरू शकता. आज जाणून घेऊया स्किन पॉलिंशिंग म्हणजे काय?
स्किन पॉलिशिंग ही एक अशी प्रक्रिया आहे जी तुमची त्वचा एक्सफोलिएट करते आणि त्वचेच्या डेड सेल्स काढून टाकण्यास मदत करते. हे तुमच्या त्वचेला ग्लो आणि मऊ त्वचा देण्यासही मदत करते. स्किन पॉलिशिंग ही ब्राइडल ट्रीटमेंटमध्ये करण्यात येते.
स्किन पॉलिश ही प्रक्रिया हायपरपिग्मेंटेशन, डाग आणि डार्क सर्कलसोबत हातपायांवर देखील एक प्रभावी ठरते. प्रत्येक स्किन टाईप असलेल्या व्यक्ती हे उपचार करू शकतात. स्किन पॉलिशिंग कोरड्या त्वचेची स्थिती सुधारते.
स्किन पॉलिशिंगचे प्रकार
1. क्रिस्टल माइक्रोडर्माब्रेशन
2. गोल्ड माइक्रोडर्माब्रेशन
3. केमिकल पील
स्किन पॉलिशिंगचे फायदे
स्किन टोनसाठी फायदेशीर- स्किन पॉलिशिंगच्या अनेक सेशनमुळे काळे डाग आणि पिगमेंटशन कमी होण्यास मदत होते. स्किन पॉलिशिंगची ही प्रक्रिया तुमच्या त्वचेचा टोन आणखी वाढवण्यास मदत करते.
फेशियलपेक्षा अधिक प्रभावी- सलूनमध्ये नियमित फेशियल केल्या जाणाऱ्या फेशियलपेक्षा स्किन पॉलिश करणं खूप फायदेशीर आहे. ते तुमच्या त्वचेवर झटपट ग्लो आणण्यास मदत करते. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते.
स्किन ग्लो होते- लग्न किंवा पार्टीसाठी स्पेशल ब्युटी ट्रीटमेंट हवी आहे त्यांच्यासाठी स्किन पॉलिशिंग सर्वोत्तम आहे. अशा स्थितीत तज्ज्ञांच्या मदतीने तुम्ही चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी स्किन पॉलिशिंग करून घेऊ शकता.
डेड स्किन सेल्स निघून जातात- स्किन पॉलिशिंग तुमच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करते आणि नवीन त्वचेच्या सेल्स वाढवण्यास मदत करते.
कसं केलं जातं स्किन पॉलिशिंग?
स्किन पॉलिशिंग वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. स्किन पॉलिशिंगच्या एका सेशनमध्ये सुमारे 45 मिनिटं ते एक तास लागतो. त्याचे सेशन 2 ते 3 आठवड्यांच्या अंतराने असतात.
स्किन पॉलिशिंगच्या मदतीने तुम्ही चमकदार आणि हेल्दी त्वचा मिळवू शकता. नववधूंसाठी ही ब्युटी ट्रीटमेंट सर्वोत्तम आहे. परंतु कोणतीही ट्रिटमेंट घेण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांचं मत घेतलं पाहिजे.