हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना...
उन्हाळा आणि पावसाळाप्रमाणे हिवाळ्यातही त्वचेची काळजी घेणं गरजेचे आहे.
मुंबई : उन्हाळा आणि पावसाळाप्रमाणे हिवाळ्यातही त्वचेची काळजी घेणं गरजेचे आहे.
हिवाळ्याच्या दिवसात अनेकदा आपण खूप गोष्टी गृहीत धरतो. पण यामुळे नकळत त्वचेचे नुकसान होते.
सनस्क्रीन - उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. ऊब मिळावी म्हणून उन्हात जावंसं वाटत असले तरीही 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ उन्हात राहू नका.
हिवाळ्यामध्ये स्मॉगमुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचा शुष्क आणि अकाली वयोवृद्ध झाल्यासारखी वाटते. अशा त्वचेवर साबणाचा अतिवापर करणं टाळा. लिक्विड सोपने त्वचा स्वच्छ आणि मोकळी करा.
हिवाळ्यात त्वचेची गरज बदलते. त्यानुसार तुमच्या प्रोडक्टमध्येही बदल करा. जुन्याच क्रीम वापरणं टाळा. अधिक मॉईश्चराईज्ड क्रीम वापरा.
हिवाळ्यात त्वचेप्रमाणे केसातही शुष्कता वाढते. म्हणून सतत तेल लावण्याची सवय टाळा. प्रामुख्याने तेलकट त्वचा असणार्या व अॅक्नेचा त्रास असणार्यांनी तेलाचा सतत अतिवापर टाळावा.
त्वचा खूपच शुष्क झालेली असल्यास मेक अपचा वापर करणं टाळा. गरज पडल्यास मेकअप करण्यापूर्वी चांगल्या दर्जाचे प्रायमर वापरावे.
हीट रूममध्ये फार काळ बसणं टाळा. यामुळे त्वचा अधिक शुष्क होण्याची शक्यता असते.