Sleeping Astro : रात्री झोप येत नसेल तर `हे` उपाय करून पाहा, `या` ग्रहांचा येतो थेट संबंध
ज्योतिषशास्त्रानुसार रात्री झोपेचे वारंवार उघडणे किंवा तुटणे याचा संबंध ग्रहांशी असतो.
मुंबई : अनेक जणांना रात्री झोप येत नाही. संपूर्ण रात्र जागून काढावी लागते. या मागे दिवसभराचा तणाव आणि जीवनशैलीची समस्या म्हणून याकडे दुर्लक्ष करतो. ज्योतिषशास्त्रानुसार रात्री झोपेचे वारंवार उघडणे किंवा तुटणे याचा संबंध ग्रहांशी असतो. त्याचा थेट संबंध राहुशी आहे. तसेच, जेव्हा शुक्र कन्या राशीमध्ये दुर्बल असतो किंवा अशुभ ग्रह बाराव्या स्थानावर असतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला हे घडते. यावर उपाय जाणून घ्या.
चंदनाचा सुगंध वापरा
चंदनामुळे राहूचे दोष आणि राहूचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे झोपण्याच्या खोलीतही चंदनाचा सुगंध वापरता येतो. राहूच्या दशमात चंदनाचा साबण, अगरबत्ती इत्यादींचा वापर करा.
बेडशीट बदला
राहुचा प्रभाव कमी करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस खोलीत गादी, उशा इत्यादींवर अगरबत्ती लावावी असे म्हणतात. दोन दिवसांनी खोलीतील बेडशीट बदला. यासोबतच झोपण्यापूर्वी हात पाय चांगले धुवावेत. यामुळे राहू दोष दूर होतो.
नकारात्मकता दूर करा
ज्योतिषशास्त्रानुसार पलंगाखाली स्वच्छता ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि व्यक्तीला चांगली झोप लागते. पलंगाखाली भरलेले अनावश्यक सामान नकारात्मक ऊर्जा देते. त्यामुळे राहूचा प्रभाव वाढतो. त्यामुळे मनात विविध प्रकारचे विचार येऊ लागतात.
या गोष्टींचे दान करा
रात्री झोपेची समस्या असेल तर राहू दोष कारण असू शकतो. अशा स्थितीत जवाचे दाणे डोक्याजवळ ठेवावे आणि सकाळी कुणाला तरी द्यावे. किंवा तुम्ही ते कबुतरे किंवा पक्ष्यांनाही खाऊ घालू शकता.
मानसिक शांततेसाठी
जर तुम्हाला मन:शांती हवी असेल तर झोपण्यापूर्वी पलंगाखाली मुळा किंवा पाणी ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी भांड्यात टाका. आणि शिवलिंगावर मुळा अर्पण करा. यामुळे ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून शांतता मिळते.