मुंबई: आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने झोपण्याची सवय असते. उदाहरणच द्यायचे झाले तर, कुणी उताने झोपते तर, कुणी पालथे, कुणी डाव्या कुशीवर झोपते तर, कुणी उजव्या कुशीवर. पण, तुम्ही जर पालथे झोपत असाल तर मात्र, तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण सतत पालथे झोपण्यामुळे तुम्हाला विवीध त्रासाला सामोरे जावे लागते.


पालथे झोपल्यामुळे कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते


कंबरदुखी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक लोक हे पालथे झोपतात. अशा वेळी आपल्या शरीराची हाडे ही नैसर्गिक आकारात राहू शकत नाहीत. तसेच, एका समांतर पद्धतीनेही राहू शकत नाहीत. असे झाल्यामुळे कंबरेवर ताण येऊन कंबरदुखीचे त्रास होऊ शकतो.


स्नायूंचे दुखणे


जेव्हा आपण पालथे झोपतो तेव्हा शरीरातील रत्काभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) चांगल्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे विश्रांतीच्या काळात स्नायूंना रक्तपुरवठा निट होत नाही. या कारणामुळे स्नायू दुखू लागतात.


मानदुखी


पालथे झोपल्यावर शरीराचा तोल नीट सांभाळला जात नाही. आपले धड आणि डोके यांच्यात विशिष्ट प्रकारचा ताण निर्माण होतो. त्यामुळे मानेच्या स्नायूंना शुद्ध रत्कपुरवठा होत नाही. परिणामी मानदुखीचा त्रास सुरू होतो.


अपचन


पालथे झोपल्यामुळे शरीराचा सर्व भार पोटावर येतो. त्यामुळे त्याचा परिणाम पोटातील आतड्यांवर होतो. आतड्यांवरील भार पचणक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे अपचन, पित्ताचा त्रास होतो.


डोकेदुखी


तुम्ही जेव्हा पालथे झोपता तेव्हा तुमची मान दुमडली जाते. तुम्हाला तुमचे डोके कोणत्यातरी एका दिशेलाच वळवावे लागते. त्यामुळे मानेच्या शिरांवर ताण पडतो. त्याचा संबंध डोक्याला होणाऱ्या रक्तपुवठ्याशी असतो. म्हणूनच असे झोपल्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो.


चेहऱ्यावरही थकवा


पालथे झोपल्यामुळे चेहऱ्याला योग्य त्या प्रमाणात ऑक्शिजन मिळत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकूत्या येणे, पिंपल्स उठने, चेहऱ्यावर थकवा जाणवने यांसारख्या गोष्टी होतात.


सांधेदुखी


पालथे झोपण्यामुळे सांधेदुखीचाही त्रास होतो.