Sleeping Problem News In Marathi: झोप हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ज्याचा आपल्या शरीरावर खूप प्रभाव पडतो. जर आपली झोप पूर्ण नसेल तर इतर आजारांना सामोरे जावे लागते. भारतीयांमध्ये झोपेचे विकार (Sleep disorders) खूप सामान्य आहेत. एका सर्वेक्षणानुसार 93 टक्के भारतीयांना झोपेचे विकार असल्याचे सांगण्यात आले. झोपेच्या सामान्य विकारांमध्ये निद्रानाश, अडथळा आणणारा स्लीप एपनिया, हायपरसोम्निया, रेस्टलेस लेग सिंड्रोम आणि शिफ्ट वर्क डिसऑर्डर यांचा समावेश होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. मात्र असे अनेक लोक आहेत ज्यांना रात्री झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, रात्री झोपण्यापूर्वी एक दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल. पण काही लोकांच्या अशाच काहीशा चुका असतात त्यामुळे रात्रीची पुरेशी झोप पूर्ण होत नाही. 


अल्कोहोलचे सेवन


झोपेसाठी अल्कोहोलचे सेवन करणे खूप धोकादायक ठरु शकते. जर रात्री तुमची झोप अपूर्ण किंवा मध्येच जाग येत असेल तर दुसऱ्या दिवशी ऑफीसच्या कामामध्ये झोप येऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अल्कोहोलचे सेवन करु नका. 


कॅफिनचे सेवन


चहा-कॉफी व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी शरीरातील कॅफीनची पातळी वाढवण्यासाठी जबाबदार असतात. अनेकदा लोकांना रात्री जेवणानंतर चॉकलेट खाण्याची सवय असते. पण, कॅफिन तुमच्या मज्जातंतूंना उत्तेजित करते. याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकतो.


वाचा : रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, नाहीतर रात्रभर अंथरुणात तळमळत पडाल 


पौष्टिक कमतरता


रात्री हलके जेवण करा, पण याचा अर्थ असा नाही की आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करु नये. आहारातील फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला मध्यरात्री भूक लागणार नाही आणि तुमची रात्री शांत झोप पूर्ण होऊ शकते. 


जड जेवण खाऊ नका


रात्री जड अन्न खाल्ल्याने अन्न पचायला खूप त्रास होतो आणि पोटफुगीचा सामना करावा लागतो. यामुळे तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटॅशियमशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रात्रीचे हेवी जेवन करु नका. 


रात्रीचे जेवण आणि झोपेत कमी वेळ


रात्रीचे जेवण लवकर करावे असे म्हणतात. कारण रात्री उठल्यावर छातीत जळजळ होते आणि झोपायला खूप भीती वाटते. रात्री तुमचे चयापचय थांबते. अशा परिस्थितीत रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 2 तास आधी करणे आवश्यक आहे.  


झोपेच्या विकाराचे निदान


झोपेच्या समस्येचे निदान करण्यासाठी एक डायरी घ्या आणि त्यात झोपेची योजना बनवा. झोपण्याची आणि झोपेतून उठण्याची वेळ निश्चित करा कॅफीन, व्यायाम, अल्कोहोल किंवा गोष्टींसारख्या झोपेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा मागोवा घ्या आणि डायरीत उल्लेख करा. जेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटता तेव्हा डॉक्टर तुम्हाला रोजच्या जीवनाशी संबंधित प्रश्न विचारतील, तेव्हा तुम्ही या गोष्टी सांगू शकता. 


झोपेच्या विकारांची कारणे


नाक आणि सायनसची सूज, दमा, उच्च रक्तदाब, पार्किन्सन रोग, क्लिनिकल नैराश्य, चिंता, खराब झोपेची पद्धत, खराब जीवनशैली, जास्त ताण, खराब आहार ही काही कारणे आहेत जी तुम्हाच्या झोपेच्या विकाराचा बळी बनवतात. 


 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)