रात्री झोप नाही येत? हे देखील असू शकतं कारण
खूप लोकांना झोप न येण्याचा त्रास आहे. किती पण प्रयत्न केले तरी त्यांना रात्री झोप येत नाही.
मुंबई : खूप लोकांना झोप न येण्याचा त्रास आहे. किती पण प्रयत्न केले तरी त्यांना रात्री झोप येत नाही. दिवसभरच्या थकव्या नंतरही जर झोप येत नाही, तर त्याचं कारण पौष्टीक आहाराची कमी असल्याने हे होवू शकतं. तुमच्या आहारात मिनरल आणि विटामिन्सचा समावेश केल्यास तुम्ही या पासून सुटका मिळवू शकता.
पौष्टीक आहार नसल्यास तुमच्या झोपेवर परिणाम होतो. एका अभ्यासात समजले की, पुरूषापेक्षा स्त्रीयांमध्ये झोप न येण्याचे मुख्य कारण पौष्टीक आहार नसणे. हे एक कारण आहे, ते डायटरी सप्लिमेंटस घेऊन हे कमी करू शकतात.
तुम्ही काय खाता आणि कस खातात, यामुळेही वाढतो टाइप 2 Diabetes चा धोका
लीड रिसर्चर Chioma Ikonte म्हणाले, तुम्ही तुमच्या आहारात पौष्टीक आहाराचा समावेश करून झोप न येण्याच्या समस्येला दूर करू शकता.
पौष्टीक आहार न घेतल्यास कमी झोप येण्यासोबत, कच्ची झोप आणि मध्य रात्री जाग येणे या समस्या होतात. आपल्या शरीराला विटामिन आणि मिनरल्सची गरज असते.
परंतू आपल्या शरिरात हे तयार होत नाही. म्हणून आपल्याला याचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. जगभरात अब्जावधी लोक कोणत्या ना कोणत्या विटामिनच्या कमीने ग्रस्त आहेत.